मुंबई : सर्वात लोकप्रिय आमदार म्हणून प्रजा फाउंडेशनने गौरविलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्या रॅलीत ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. बुधवारी झालेल्या प्रचार फेरीदरम्यान नांदगावकर यांना शिवडीकरांनीही चांगला प्रतिसाद दिला.प्रजा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात सलग चौथ्या वर्षी ‘लोकप्रिय आमदार’ म्हणून लोकांनी नांदगावकर यांची निवड केली आहे. त्याचा प्रत्यय आजची रॅली पाहून आला. श्रद्धा सोसायटी ते आंबेवाडीदरम्यान नांदगावकर यांच्या प्रचारासाठी निघालेल्या रॅलीत स्थानिक स्वत:हून सामील झाले. येथील यशोधन, चुनाभट्टी, दीपकज्योती, टॉवर, वाडिया बाग, साईसदन, मिंट कॉलनी, खटाव बिल्डिंग या विभागात सकाळच्या सत्रात प्रचार करण्यात आला. तर दुपारच्या सत्रात तावरीपाडा, साईमंदिर, गणेश गल्ली परिसर, विमावाला हाऊस, प्रभंजन ते बेस्ट वसाहत, रावपथ अशा अनेक ठिकाणी प्रचारफेरी व चौकसभांमुळे संपूर्ण वातावरण मनसेमय झाले होते.रॅलीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत नांदगावकर यांना पाठिंबा घोषित केला. नांदगावकर यांनी आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड आणि पाणपोई उभारल्याने विभागातील ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी एक हक्काची जागा मिळाल्याची पाठिंबा देणाऱ्या ज्येष्ठांनी सांगितले. याशिवाय एसटी स्टँडची बांधणी करून बुकिंग सेंटर उभारल्याने चाकरमान्यांची उत्तम सोय झाली आहे.
नांदगावकरांच्या रॅलीत ज्येष्ठांचा सहभाग
By admin | Updated: October 9, 2014 04:18 IST