शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जुन्नरकरांना बिबट्या देतोय सहजीवनाचे धडे! लोकांची बदलतेय मानसिकता, पर्यावरण व पर्यटनप्रेमींना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:05 IST

बिबट्यांच्या हल्ल्यामुळे एके काळी भयभीत झालेले जुन्नर तालुक्यातील नागरिक आता बिबट्यासोबत हळूहळू सहजीवनाचे धडे गिरवताना दिसू लागले आहेत. आज समस्या वाटणारा बिबट्या उद्या जुन्नर पर्यटनाचा मुख्य पर्यटनदूत होईल हे लक्षात आल्याने दहशतीपेक्षा सजगतेतून निर्माण होणारी सोबतीची भावना वाढत आहे.

अशोक खरात खोडद : बिबट्यांच्या हल्ल्यामुळे एके काळी भयभीत झालेले जुन्नर तालुक्यातील नागरिक आता बिबट्यासोबत हळूहळू सहजीवनाचे धडे गिरवताना दिसू लागले आहेत. आज समस्या वाटणारा बिबट्या उद्या जुन्नर पर्यटनाचा मुख्य पर्यटनदूत होईल हे लक्षात आल्याने दहशतीपेक्षा सजगतेतून निर्माण होणारी सोबतीची भावना वाढत आहे.एरवी बिबट्याला घाबरणारा जुन्नरकर आता बिबट्याविषयी साक्षर झालाय. मागील वर्षी वन विभाग जुन्नर, एसओएस संस्थेच्या माध्यमातून चालणारे बिबट्या निवारा केंद्र आणि जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांतून ‘पर्यावरण साक्षरता कार्यशाळा’ गावोगावी घेण्यात आल्या होत्या. कार्यशाळेच्या माध्यमातून गावकºयांना बिबट्याविषयी सजग करण्यात आले. लोक बिबट्याला सरावले. मानव-बिबट्या संघर्ष राहीलच; पण त्याकडे साक्षर आणि सकारात्मक दृष्टीने बघत जर एकमेकांना जागा दिली, तर एकत्रितपणे राहता येते हा विचार रुजत असल्याचे चित्र दिसत आहे.जुन्नर तालुक्यात ५ धरणांमध्ये पाणी अडवले जाऊ लागले. एके काळी कोरडवाहू म्हणून गणला गेलेला जुन्नरचा पूर्व आणि मैदानी पट्टा आता बाराही महिने हिरवा दिसू लागला. कमी मेहनतीतले आणि हमखास परतावा देणारे पीक म्हणून उसाची शेती बहरली. उसाने समृद्धी आणली आणि त्याचसोबत नकळतपणे बिबट्यादेखील आला. मग हाच मांजरकुळातील बिबट्या निवाºयासाठी वस्तीजवळ उसात येऊ लागला. बिबट्यांकडून होणारे हल्ले, रात्री किंवा अगदी भरदिवसा होणारे बिबट्याचे दर्शन यामुळे बिबट्याच्या वास्तवाची जुन्नरकरांना सवयच झाली आहे.जुन्नरच्या शेतीपूरक अर्थव्यवस्थेला एक पर्याय म्हणून पर्यटन समोर येत असताना बिबट्या त्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, ही बाब प्रकर्षाने लोकांना जाणवत आहे. बिबट्या हा निशाचर आणि मार्जर म्हणजेच मांजर कुळातील प्राणी आहे. बिबट्याच्या मादीची ९० ते १०५ दिवस गर्भधारणा असते. ही मादी एका वेळी १ ते ४ पिलांना जन्म देते. बहुतांशी यातील २ पिले जगतात. ही पिले २ वर्षांची होईपर्यंत मादी त्यांचा सांभाळ करते, अशी माहिती माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली.बिबट्या सफारी विधायक पाऊलवाढत्या लोकसंख्येला व शेतीतील अनिश्चिततेला एक सशक्त पर्याय म्हणून याच उपलब्ध वारशाच्या मदतीने पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती शक्य आहे. सध्या थोड्या प्रमाणात पर्यटन वाढीसही लागले आहे; पण दूरदृष्टी ठेवून पर्यटनातून शाश्वत समाजविकास साधायचा असेल, तर जबाबदार पर्यटन करण्याशिवाय पर्याय नाही. जुन्नरमध्ये होऊ घातलेली बिबट्या सफारी हा त्याचाच परिपाक आहे.- मनोज हाडवळे,अध्यक्ष, जुन्नर पर्यटन विकास संस्थासाकारावे बिबट्यांचे गावसर्वाधिक बिबटे जुन्नर तालुक्यात आहेत. पूर्वी पर्वतरांगांत आणि जंगलात राहणारा हा बिबट्या जंगल कमी झाल्यामुळे मानवी वस्त्यांजवळ उसाच्या शेतात राहू लागला आणि उसाची शेती हेच त्याच जंगल बनले. बिबट्याच्या वास्तव्यामुळे जुन्नरच्या पर्यटनात भर पडली आहे. एखाद्या गावात ‘बिबट्याचे गाव’ ही संकल्पना सुरू केल्यास बाहेरून येणाºया पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.- अर्जुन म्हसे, उपवनसंरक्षक, जुन्नर विभाग९० ते १०५दिवस बिबट्याच्या मादीची गर्भधारणा असते०१ ते ०४पिलांना एका वेळी देते जन्म०२ पिलेजगतात०२ वर्षांची होईपर्यंतमादीकरतेयसांभाळ