शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून उडी टाकून चोराला पकडले

By admin | Updated: June 2, 2017 05:19 IST

मुंबईकडे येणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या समाधान मिस्त्री या तरुणाच्या हातावर लाकडाने

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबईकडे येणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या समाधान मिस्त्री या तरुणाच्या हातावर लाकडाने फटका मारून त्याचा मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या एका चोरट्याला मिस्त्रीने धावत्या ट्रेनमधून उडी मारून पकडल्याची घटना गुरुवारी घडली. या साहसी तरुणाची रेल्वे पोलिसांकडून प्रशंसा करण्यात आली.पुणे येथे राहणारा मिस्त्री गुरुवारी सकाळी हुतात्मा एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान तो रेल्वेच्या दरवाजात उभे राहून मोबाइलवरील मेसेज बघत असताना कल्याणच्या पत्रीपूल येथे रु ळालगत उभ्या असलेल्या चोरट्याने समाधानच्या हातावर लाकडी दांडक्याने जोरदार फटका मारला. त्यामुळे समाधानचा मोबाइल खाली पडला. हा मोबाइल घेऊन चोरटा पळाला. मात्र, क्षणाचा विलंब न लावता समाधानने धावत्या ट्रेनमधून उडी मारून तब्बल एक किलोमीटर त्या चोरट्याचा पाठलाग केला. चोरटा रुळालगत असलेल्या ‘श्रीकृष्णनगर’मध्ये घुसला. मिस्त्रीने चोर...चोर... असा आरडाओरडा करताच तेथे असलेल्या संजय चौधरी आणि सचिन आमकर या दोन तरु णांनी प्रसंगावधान राखत या चोरट्यावर झडप घालून त्याला पकडले. चोरट्याने प्रतिकाराकरिता अगोदरच हातात दगड घेतला होता. मात्र, या दोघांनी जीवाची पर्वा न करता त्याला पकडले. कल्याण रेल्वे पोलिसाच्या ताब्यात त्याला देण्यात आले. अयाज शेख असे या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. प्रसंगावधान राखत समाधान मिस्त्री तसेच संजय चौधरी आणि सचिन आमकर यांनी चोराला जेरबंद केल्याबद्दल पोलिसांनी या तिघांचे कौतुक केले.