शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
4
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
5
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
6
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
7
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
8
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
9
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
10
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
11
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
12
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
13
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
14
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
15
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
17
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
18
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
19
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
20
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता

रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच माझा आॅक्सिजन

By admin | Updated: May 28, 2017 01:08 IST

तात्याराव लहाने : कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘अत्याधुनिक उपचार पद्धतीअभावी, तसेच पाहू न शकणाऱ्या गोरगरीब रुग्णांवर जेव्हा मी शस्त्रक्रिया करतो आणि एक-दोन दिवसांनी जेव्हा दिसायला लागल्याचे पाहून त्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील जो आनंद दिसतो, तोच माझा आॅक्सिजन आहे,’ असे प्रतिपादन मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलचे डीन आणि लाखो रुग्णांचा दृष्टिदाता डॉ. तात्याराव लहाने यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले. कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात डॉ. लहाने बोलत होते. त्यांनी यावेळी अनेक अनुभव, आठवणी सांगितल्या. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्यावरील शस्त्रक्रियेबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. बाबा आमटे यांच्या कार्याची प्रेरणा आणि आईच्या किडनीमुळे मिळालेले आयुष्य यामुळे मला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. गोरगरीब रुग्ण हाच आपल्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अत्याधुनिक उपचारांअभावी अनेकजण पाहू शकत नाहीत, असे गरजू रुग्ण माझ्याकडे येतात. मी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करतो. जेव्हा दिसायला लागल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळतो, तो क्षण माझ्या दृष्टीनेही आनंददायी असतो. हाच आनंद हाच माझा आॅक्सिजन आहे. मी आता जे. जे. रुग्णालयाचा अधिष्ठाता असलो तरीही माझी रुग्णसेवा सुरूच आहे. अधिष्ठातामध्ये अडकलो असतो तर मी कारकून झालो असतो. म्हणून सकाळी सात वाजल्यांपासून दुपारी एकपर्यंत डॉक्टर म्हणून शस्त्रक्रिया करतो आणि दुपारी दोननंतर मी अधिष्ठाता असतो, असे लहाने म्हणाले. शासकीय रुग्णालयातील प्रत्येक अधिष्ठाताने वैद्यकीय व्यवसाय केलाच पाहिजे. त्यांनी केवळ व्यवस्थापनात व्यस्त राहून आपल्यातील डॉक्टरला मारता कामा नये. यासंदर्भात मी राज्य सरकारच्या यंत्रणेलाही तशी सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून नेत्रोपचाराच्या अत्याधुनिक सुविधा खेडेगावातून पोहोचल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. त्यासाठी आम्ही राज्याच्या सर्वच जिल्ह्णांत जाऊन रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याचे लहाने यांनी सांगितले. समाजसेवा करणे कठीण काम नाही. चांगले काम करताना काही वेळेला अडचणी या येतात; पण ते गृहित धरून काम करायचे असते. मलाही माझ्या जीवनात असे अनेक अडथळे निर्माण झाले. मध्यंतरी एका प्रकरणात बराच त्रास झाला. तेव्हा मी नोकरी सोडण्याची तयारी केली होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीमुळे तो विचार सोडून दिला, असेही लहाने यांनी सांगितले. प्रारंभी अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी स्वागत केले, तर उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी आभार मानले. अवयवदान चळवळ व्यापक व्हावी राज्यात अवयवदान चळवळ व्यापक झाली पाहिजे, त्याकरिता जनजागृती होणे फार महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा डॉ. लहाने यांनी व्यक्त केली. नेत्रदानाबाबत गैरसमज जास्त आहेत. यापुढेही ते तसेच सुरू राहिले, तर अंध हे अंधच राहतील. विज्ञान माहीत असूनही अपेक्षेइतके नेत्रदान मिळत नाही. किडनीदानाच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले.देशात २२ लाख रुग्णांना नेत्रांची गरज महाराष्ट्रात दोन लाख रुग्णांना नेत्रांची गरज२५ हजार लहान मुलांना नेत्रांची गरज