नवी मुंबई : दिघा येथील अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पत्रकारांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी अद्यापपर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. त्यांची ओळखपरेड आज रबाळे पोलीस ठाण्यात झाली. यावेळी अटकेत असलेल्या एकाने पोलीस भरतीसाठी अर्ज केल्याचे समोर आले. न्यायालयाच्या आदेशानुसार दिघा येथे अनधिकृत इमारतींवर जप्तीची कारवाई सुरू असताना पत्रकारांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात महिला पत्रकार स्वाती नाईक व कॅमेरामन संदीप भारती यांच्यावर जमावाने हल्ला केलेला. हल्ला करणारे २३ ते ३० जण त्याच परिसरातील इतर अनधिकृत इमारतींमधील होते. (प्रतिनिधी)
पत्रकारांवर हल्ला; नऊ अटकेत
By admin | Updated: March 4, 2017 02:09 IST