शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमधील जोशी रुग्णालयाचा भार 3 डॉक्टरांवरच, कर्तव्य बजावणारे डॉक्टर संपाच्या पावित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:26 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ तीनच डॉक्टरांवर सोपवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

राजू काळे/भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ तीनच डॉक्टरांवर सोपवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डॉक्टरांच्या संख्येत तातडीने वाढ करण्याची मागणी या डॉक्टरांकडून प्रशासनाकडे सतत करण्यात येत आहे. यावर त्वरित कार्यवाही न केल्यास ते डॉक्टर आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात असल्याचे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.  

सुमारे 200 खाटांचे हे रुग्णालय 10 जानेवारीला रुग्णसेवेत दाखल झाले. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवा देण्याच्या प्रतीक्षेत असलेले हे रुग्णालय तूर्तास 100 खाटांच्या क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. हे रुग्णालय सुरुवातीपासूनच तोकड्या वैद्यकीय सोईसुविधायुक्त ठरू लागले आहे. खासगी रुग्णसेवेत बक्कळ पैसा कमावणारे डॉक्टर कमी पगारात पालिकेच्या रुग्णालयात नियुक्त होण्यास उत्सुक नसल्यानेच डॉक्टरांची वानवा असल्याचा दावा प्रशासनाकडून सतत केला जात आहे. 

यामुळे अनेकदा जाहिरातीच्या माध्यमातून डॉक्टर नियुक्तीचा प्रयत्न प्रशासनाने करुनही डॉक्टरांची पुरेशी संख्या अद्याप तोकडीच राहिलेली आहे. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असून एका वैद्यकीय अधिका-याला अनेकदा 24 तासांची रुग्णसेवा नाईलाजास्तव द्यावी लागत आहे. या रुग्णालयात काही स्थानिक खासगी डॉक्टरांनी बाह्य रुग्ण विभागात मोफत सेवा देण्याला सुरुवात केली आहे. रुग्णालयात सध्या छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया विभाग, प्रसुती विभाग, पुरुष व स्त्री वैद्यकीय विभाग, कुपोषित बालक उपचार कक्ष (पोषण पुर्नवसन केंद्र), सोनोग्राफी, अपघात विभाग सुरू आहेत. यात वैद्यकीय अधिका-यांसह काही विशेषज्ज्ञांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली असून प्रत्येकी 1 पॅथोलॉजिस्ट, मनोविकारतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ, (नाक, तोंड, घसा) ईएनटी विकार तज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांचा समावेश आहे. हे विशेषज्ज्ञसुद्धा बाह्यरुग्ण विभागात सेवा देऊन दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची आवश्यकतेनुसार तपासणी करतात. परंतु, संध्याकाळी ४ ते सकाळी ९ वाजेदरम्यान महत्त्वाच्या वेळेत मात्र केवळ चार डॉक्टरांवर ५० रुग्णांचा भार सोपवण्यात आला आहे. 

यातील एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अलिकडेच रुग्ण दगावल्याची घटना घडल्याने त्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. यामुळे सध्या तीनच डॉक्टरांवर रुग्णसेवेचा भार टाकण्यात आला आहे. प्रत्यक्षात अस्तित्वातील रुग्णांच्या संख्येनुसार रुग्णालयात १२ डॉक्टरांची आवश्यकता आहे. यावरुन कर्तव्य बजावणा-या तीन डॉक्टरांच्या सहकार्यासाठी आणखी 8 डॉक्टरांची नियुक्ती प्रशासनाकडून होणे अपेक्षित असताना अद्याप पुरेशा डॉक्टरांची नियुक्ती करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे कंटाळलेल्या एका स्त्रीरोगतज्ज्ञाने अलिकडेच राजीनामा दिला आहे. या अपु-या संख्येतच त्या तीन वैद्यकीय अधिका-यांना शवविच्छेदन केंद्रातही सेवा द्यावी लागत असल्याने ते अधिकारी पुरते हैरान झाले आहेत. प्रशासनाने त्वरीत पुरेशा वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांच्या केली जात आहे. 

डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरूपालिकेने पुरेशा डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली असुन त्याच्या जाहिरातीचा मसुदा तयार करण्यात येत आहे. लवकरच थेट मुलाखतीतून निवड झालेल्या डॉक्टरांची नियुक्ती जोशी रुग्णालयात केली जाणार आहे. -डॉ. प्रकाश जाधव, पालिका वैद्यकीय विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी