शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

फुकटात मिळणार जिओचा 4G स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 15:32 IST

रिलायन्स जिओनं प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - रिलायन्सचा 4जी स्मार्टफोन मोफत असेल असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना जाहीर केले. अर्थात, कुठलीही गोष्ट मोफत दिली तर तिचा दुरुपयोग होतो असे सांगत, हे टाळण्यासाठी 1500 रुपये सुरक्षा अनामत म्हणून घेण्यात येणार असून तीन वर्षांनी ही रक्कम ग्राहकाला परत करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिओ स्मार्टफोनमध्ये 12 भाषा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि यूएसबीच्या सुविधा आहेत. जिओ स्मार्टफोन हा इतर स्मार्टफोनपेक्षा खूप पावरफूल आहे. जिओ म्युझिक, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही हे फिचर्स आधीपासून या स्मार्टफोनमध्ये लोड करण्यात आले आहेत. या फोनवर 153 रुपयांत प्रत्येक महिन्याला फ्री व्हाइससह अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. जिओ 4 जी व्होल्ट फोनची इफेक्टिव्ह किंमत शून्य आहे. मात्र 1500 रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार असून, तीन वर्षांनंतर पूर्ण रिफंड मिळणार आहे, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. या फोनवर व्हॉइस कॉलिंग मोफत मिळणार आहे. जिओ फोन कोणत्याही टीव्हीला जोडता येऊ शकणार आहे.रिलायन्स जिओच्या या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले आणि 512 एमबी रॅम असणार आहे. तसेच 4 जीबी इंटर्नल स्टोरेज सुविधा असेल. तर 128 जीबी मेमरी कार्डची सुविधाही देण्यात आली आहे. 2 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि VGA फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. याचबरोबर या फोनमध्ये डेडिकेटेड की असणारी टॉर्च लाइट दिली आहे. तर 2000mAh इतकी बॅटरी सुद्धा असेल. 

जिओच्या फोनवर दोन दिवसांचा इंटरनेट प्लॅन 24 रुपयांना मिळणार असून, आठवड्याचा प्लॅनसाठी 54 रुपये मोजावे लागणार आहेत. जिओ फोनच्या माध्यमातून तुम्हाला टीव्ही केबल पाहता येणार असून, त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 309 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. जिओच्या व्हॉइस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट करण्यासाठी विविध फिचर देण्यात आले आहेत. जिओ फोन हा भारतीय बनावटीचा आहे. जिओचा नवा फोन 24 ऑगस्टनंतर प्रीबुक करता येणार आहे, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. प्रत्येक आठवड्याला 50 लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्ध करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.