शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डबॉय ते सायंटिस्ट सगळ्यांना नोकऱ्या; महारोजगार मेळाव्यात ८००० जागांसाठी मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 06:55 IST

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी विद्यार्थी आणि नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी महारोजगार मेळावा आयोजित केला होता

मुंबई : दहावी-बारावी पास-नापास उमेदवार, पदवी-पदविकाधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी,  अगदी टेली कॉलर, वॉर्डबॉयपासून ते मॅनेजमेंट, आयटी, विज्ञान पदवीधारक, मीडिया आणि एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी उमेदवारांनी शनिवारी कौशल्य विकास विभागाकडून मुंबईत आयोजित महारोजगार मेळाव्यात मुलाखती दिल्या. 

मेळाव्यात सहभागी विविध कॉर्पोरेट कंपन्या, उद्योगांमध्ये मिळून ८  हजार ४४८ रिक्त जागांसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या. शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत साधारण २ हजार उमेदवारांनी या नोकऱ्यांसाठी या मेळाव्यात सहभाग घेतला. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी विद्यार्थी आणि नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी महारोजगार मेळावा आयोजित केला होता. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील, असे स्पष्ट केले. 

स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शनविविध कंपन्या आणि महामंडळाचा सहभाग टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, बझवर्क्स बिजनेस सर्व्हिसेस, युवाशक्ती स्किल इंडिया, युनिकॉर्न इन्फोटेक, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस, करिअर एंट्री, टीम हायर अशा २० हून अधिक कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,अशा ११ महामंडळांनी सहभाग घेतला.

महास्वयम ॲप उपलब्ध करून देणार विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम राबवत आहे. त्यानुसार राज्यात १ लाख २५ हजार रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर विभागाने सामंजस्य करार केले आहेत. येत्या काळात राज्यभरात असे ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे. उद्योग आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी येत्या दोन महिन्यांत मोबाईलवर महास्वयम ॲप उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी घोषित केले.  

टॅग्स :jobनोकरी