शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहांतील अनाथांवरील नोकरीतील अन्याय अखेर दूर, राज्य सरकारचा मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 11:33 IST

मिळणार आरक्षणाचा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मान्यताप्राप्त बालगृहे/अनाथालयांमध्ये राहून शिकलेल्या अनाथ मुला-मुलींवर अनाथांसाठीच्या आरक्षणांतर्गत नोकऱ्या देताना होणारा अन्याय शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी एका आदेशाद्वारे दूर केला. त्यामुळे अनाथालयांतून पुढे आलेल्यांना आरक्षणाचा आता खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे.

अनाथांना सरकारी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतला होता. त्यानुसार, अनाथालयांमध्ये राहिलेली अशी मुले ज्यांना आई-वडील वा नातेवाइकही नाहीत (अ वर्ग) आणि अशी मुले की ज्यांना काही नातेवाइक असले तरी ती सुरुवातीपासूनच अनाथालयांमध्ये वाढली (ब वर्ग) अशांना समांतर आरक्षण लागू झाले.

मात्र, ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने एक शासन निर्णय काढला. त्यानुसार अनाथालयांमध्ये वाढली नाहीत पण काही नातेवाइकांकडे मोठी झाली अशा मुला-मुलींनाही समांतर आरक्षणाचा लाभ देण्यात आला. मात्र पुढे असे लक्षात आले, की नातेवाइकांकडे वा समाजात पालनपोषण झालेली मुलांची  अभ्यासात तुलनेने अधिक प्रगती झालेली असते. त्यामुळे २०१८ पासून अनाथालयांमधील केवळ दोघांना तर बाहेरच्या ५० हून अधिक जणांना सरकारी नोकरी मिळाली. ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील म्हणजे अनाथालयांत मोठे झालेल्या अनाथांवरील अन्याय दूर व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीची पूर्तता करणारा शासन निर्णय गुरुवारी निघाला.

निर्णयानुसार,

  • आता एका सरकारी खात्यात दोन पदे अनाथांसाठी आरक्षित असतील तर त्यापैकी एक जागा ही ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील मुलामुलींना दिली जाईल. दुसरी जागा ‘क’ वर्गाला मिळेल. 
  • जर एकच जागा आरक्षित असेल तर रोटेशननुसार ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील अनाथांना दिली जाणार आहे. म्हणजे एकच आरक्षित जागा असेल तर आधी ‘अ’, ‘ब’ व नंतरची आरक्षित एक जागा ‘क’ वर्गाला, त्यानंतर निघालेली एक जागा पुन्हा ‘अ’, ‘ब’ वर्गाला मिळेल.
  • पहिल्या भरती प्रक्रियेमध्ये तीन पदे उपलब्ध झाल्यास दोन पदे ‘अ’आणि ‘ब ’वर्गासाठी व एक पद संस्थाबाह्य उमेदवारांना दिले जाईल. दोन पदे असल्यास दोन्हींना एकेक मिळेल. 
  • त्या पुढील भरती  प्रक्रियेमध्ये पुन्हा तीन पदे उपलब्ध झाल्यास दोन पदे ‘क’ वर्ग  उमेदवारांना तर एक पद ‘अ’, ‘ब’ वर्गासाठी आरक्षित असेल. या निमित्ताने  सरकारने ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या तिन्ही वर्गांसाठीचे अनाथ आरक्षण कायम ठेवले आहे.

अनाथ आरक्षणाची अंमलबजावणी दिव्यांग आरक्षणाच्या धर्तीवर केली जाईल. हे आरक्षण शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, व्यावसायिक शिक्षण प्रवेश व सरकारी पदभरतीसाठी लागू असेल. असे मागणीची पूर्तता करणाऱ्या शासन आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :jobनोकरी