शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

देशसेवेसाठी इंजिनिअरने सोडली लठ्ठ पगाराची नोकरी

By admin | Updated: February 20, 2017 11:48 IST

देशसेवेचा ध्यास असल्याने सैन्यात दाखल होण्यासाठी एका तरुणाने देशातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्विसेसमधील (टीसीएस) लठ्ठ पगाराची नोकरी सोडली आहे.

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 20 - देशसेवेचा ध्यास असल्याने सैन्यात दाखल होण्यासाठी एका तरुणाने देशातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्विसेसमधील (टीसीएस) लठ्ठ पगाराची नोकरी सोडली आहे. भारत जाधव असे या तरुणाचं नाव असून तो बुलडाणा जिल्ह्यातील सुटाळा बुद्रुक गावातील रहिवासी आहे.  
 
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, 25 वर्षांचा भारत जाधव हा टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होता. वडिलांचं निधन झाल्यानंतर घरातील परिस्थिती हलाखीची झाली. मात्र आईनं मोठ्या कष्टाने त्याला शिकवलं. लहानपणापासूनच हुशार असलेल्या भारतने शेगावमधील संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2014 मध्ये पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी मिळाली. पण देशभक्तीने पछाडलेल्या भारतचं आयटी सेक्टरमध्ये मन रमत नव्हते.  
 
सैन्यात दाखल होण्यासाठी त्यानं 2010 एनडीएची परीक्षा दिली. मात्र यावेळी परीक्षेत अपयश आल्याने त्याची संधी हुकली. पण खचून न जाता त्याने आपले प्रयत्न सुरू ठेवले. 2016 मध्ये कम्बाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) ही संरक्षण दलाची परीक्षा दिली आणि त्यात त्याला यशही आले. 153 उमेदवारांमध्ये 108वा क्रमांक मिळवला असून तो एक एप्रिलपासून चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अकाडमीत प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे.
 
दरम्यान, ऑफिसच्या एसीमधून बसून नेहमी एकसारखेच काम करायचे नव्हते. देशासाठी काही तरी करण्याची इच्छा होती, त्यामुळे आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अशी प्रतिक्रिया भारतने दिली आहे.  48 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारत आर्मीमध्ये शॉर्ट सर्विस कमिशनर पदावर रुजू होणार आहे. केवळ भारतच नाही तर त्याचे कुटुंबीयही संरक्षण दलात आहेत. भारतची लहान बहिण ही सीमा सशस्त्र दलात आहे. तर त्याचा लहान भाऊदेखील आर्मीत आहे. तर त्याची मोठी बहिण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात नर्स आहे.