शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीचे चौथे बंदर डिसेंबरमध्ये सुरू होणार, ५० लाख कंटेनर हाताळणीची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:58 IST

उरण : सुमारे ५० लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेले पीएसएचे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येत्या डिसेंबरमध्ये कार्यान्वित होणार आहे. हे बंदर देशातील सर्वांत मोठ्या लांबीचे आणि क्षमतेचे आहे. थेट परकीय गुंतवणूक आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारण्यात येणारे हे देशातील पहिले बंदर ठरणार आहे.जेएनपीटी बंदरांतर्गत खासगीकरणातून उभारण्यात येणारे पीएसएचे बीएमसीटी ...

उरण : सुमारे ५० लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेले पीएसएचे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येत्या डिसेंबरमध्ये कार्यान्वित होणार आहे. हे बंदर देशातील सर्वांत मोठ्या लांबीचे आणि क्षमतेचे आहे. थेट परकीय गुंतवणूक आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारण्यात येणारे हे देशातील पहिले बंदर ठरणार आहे.जेएनपीटी बंदरांतर्गत खासगीकरणातून उभारण्यात येणारे पीएसएचे बीएमसीटी हे चौथे बंदर आहे. बंदरात अद्ययावत अशा सुपर पोस्ट पॅनामॅक्स क्वे क्रेन्स-६, रबर टायर्ड ग्रॅन्ट्री क्रेन्स-१८, रेल माऊंटेड ग्रॅन्ट्री क्रेन्स-४ बसवल्या आहेत. इथल्या कामाचे ३८ जणांना आॅगस्टमध्ये प्रशिक्षण मिळाले होते. त्यांना तज्ज्ञांकडून कार्गो हाताळणीच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. हा अनुभव फायदेशीर ठरणार असल्याचे प्रशिक्षार्थी भावना भोईर यांनी सांगितले. इतर घटकांबरोबरच क्वालिटी कंट्रोलवरही चांगल्या प्रकारे लक्ष देण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातून क्युसी क्रेन्स स्वत:हून चालविण्याचा भक्कम आणि सक्षम अनुभव मिळाला असल्याचे अभिजित कडू यांनी सांगितले. जेएनपीटी आणि संबंधित अधिकाºयांसोबत काम करून बंदर क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा बीएमसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश अमिरपू यांनी केला.

टॅग्स :JNPTजेएनपीटी