शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

ज्येष्ठांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ योजना, ज्येष्ठांच्या शतायुषाची कामना अन् पवारांचे नाव

By यदू जोशी | Updated: February 16, 2021 07:01 IST

Sharad Pawar : अलीकडे ८१व्या वर्षात पदार्पण केलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नावही योजनेच्या नावात येणार असले तरी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक शतायुषी व्हावा, हा या योजनेचा उद्देश असेल.

- यदु जोशी

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचारांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ आरोग्य योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्याचे प्रस्तावित आहे. अलीकडे ८१व्या वर्षात पदार्पण केलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नावही योजनेच्या नावात येणार असले तरी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक शतायुषी व्हावा, हा या योजनेचा उद्देश असेल.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेची संकल्पना मांडल्यानंतर योजनेचा प्रस्ताव विभागामार्फत तयार केला जात आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजना जाहीर करण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतर आरोग्याची कुठल्याप्रकारे काळजी घेतली पाहिजे हे समजण्यासाठी आधी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या होणे गरजेचे असते. मात्र, आर्थिक परिस्थिती, घरातील ज्येष्ठांबाबतची अनास्था वा  एकूणच आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचा ज्येष्ठ नागरिकांचा स्वभाव यामुळे बरेचदा वेळीच आरोग्य तपासणी केली जात नाही आणि मग अचानक मोठ्या आजाराचे निदान झाल्यानंतर प्रकृती हाताबाहेर जाते. त्या ऐवजी वेळीच सर्व आरोग्य तपासण्या केल्या तर नंतर उद्भवणाऱ्या प्रकृतीच्या तक्रारी टाळता येतील हा योजनेचा उद्देश आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीची कोणतीही योजना आज राज्यात नाही. कोरोनानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका आहे. जे त्यातून बरे झाले त्यांच्या तब्येतीचे वेगळे प्रश्न आता समोर येत आहेत. अशावेळी सर्वच ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार हा विषय अधिक गंभीर आणि जिव्हाळ्याचा बनला असताना या योजनेद्वारे त्यांना दिलासा मिळणार आहे.

योजनेच्या बाहेर असलेल्यांना प्रसंगी अनुदान  ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीवरच न थांबता त्यांना उपचारासाठी उपलब्ध योजनांचा लाभ देणे आणि जे ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या बाहेर आहेत त्यांना प्रसंगी अनुदान देणे असे ‘जिवेत् शरद: शतम्’ आरोग्य योजनेचे स्वरूप असेल.- धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार