शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपतींकडून ९ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 23:08 IST

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; केंद्राकडून ९ राज्यांमध्ये राज्यपालांचे मोठे फेरबदल

Governor of Maharashtra: देशातील ९ राज्यांच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले असून, लवकरच या सर्व राज्यपालांचा शपथविधी पार पडणार आहे.

जिष्णू देव वर्मा; महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणून अनुभवी असलेले जिष्णू देव वर्मा आता महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळणार आहेत. अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीत त्यांच्या अनुभवाचा राज्याला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल आणि जिष्णू देव वर्मा यांच्या पदभार स्वीकृतीबाबत लवकरच अधिकृत लोकभवन पत्रक प्रसिद्ध केले जाईल.

देशभरातील महत्त्वाच्या नियुक्त्या 

संपूर्ण देशात झालेल्या या मोठ्या फेरबदलात अनेक अनुभवी नेत्यांना आणि निवृत्त अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहेय

महाराष्ट्र: जिष्णू देव वर्मा (तेलंगणाहून बदली)

दिल्ली (उपराज्यपाल): तरनजीत सिंह संधू (माजी राजदूत)

लडाख (उपराज्यपाल): विनय कुमार सक्सेना (दिल्लीहून बदली)

बिहार: लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन

पश्चिम बंगाल: आर. एन. रवी (तमिळनाडूहून बदली)

तेलंगणा: शिव प्रताप शुक्ला (हिमाचल प्रदेशहून बदली)

हिमाचल प्रदेश: कविंदर गुप्ता (लडाखच्या उपराज्यपाल पदावरून बढती)

नागालँड: नंद किशोर यादव

तमिळनाडू: राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (केरळचे राज्यपाल असूनही तमिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार) 

English
हिंदी सारांश
Web Title : Jishnu Dev Varma Appointed Maharashtra Governor; Nine States See Governor Reshuffle

Web Summary : Jishnu Dev Varma is appointed as the new Governor of Maharashtra amidst a major reshuffle of governors across nine states. President Murmu approved the appointments; oath ceremonies will follow soon. Key changes include governors being transferred and new appointments being made in states and union territories.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र