शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिग्नेश शहाच्या कंपनीला दिलासा नाही

By admin | Updated: July 21, 2016 05:26 IST

(एफटीआयएल) ची संपत्ती जप्त करण्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यु) बजावलेल्या नोटीसला अंतरिम स्थगिती देण्यास बुधवारी उच्च न्यायालयाने नकार दिला

मुंबई : फायनान्शिअल टेक्नॉलॉजिस् लि. (एफटीआयएल) ची संपत्ती जप्त करण्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यु) बजावलेल्या नोटीसला अंतरिम स्थगिती देण्यास बुधवारी उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे जिग्नेश शहाला मोठा दणका बसला आहे.संपत्ती जप्तीसंदर्भात ईओडब्ल्युने एफटीआयएलला नोटीस बजावली आहे. या नोटीसला स्थगिती द्यावी, यासाठी एफटीआयएलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.‘संपत्ती जप्तीची नोटीस बजावण्याचा अधिकार पोलिसांना नाही. गेल्यावर्षी उच्च न्यायालयाच्या अन्य खंडपीठाने या नोटीसला स्थगिती दिली होती,’ असा युक्तिवाद एफटीआयलतर्फे ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी खंडपीठापुढे केला.त्यावर खंडपीठाने ही सुद्धा याचिका नियमित खंडपीठापुढे सुनावणीसाठी जाऊ द्या, असे म्हटले. त्यावर अ‍ॅड. कदम यांनी नियमित खंडपीठ बसले नसल्याचे सांगितले. ‘उच्च न्यायालयाच्या अन्य खंडपीठाने जप्तीच्या नोटीसला स्थगिती दिली असतानाही खंडपीठाच्या परवानगीशिवाय नवी नोटीस काढणे, म्हणजे न्यायालयाचा अवमान केल्यासारखे नाही का? पोलिसांनी बँक खाती गोठवली तर कंपनीने दिलेले चेक बाऊन्स होतील आणि कंपनीविरुद्ध चेक बाऊन्सच्या केसेस नोंदवल्या जातील,’ असे अ‍ॅड. कदम यांनी खंडपीठाला सांगितले.तर ईओडब्ल्युच्या वकिलांनी एफटीआयलाच्या याचिकेला विरोध केला. ‘ईओडब्ल्युने संपत्ती जप्तीबाबत एफटीआयएलला नोटीस बजावली नाही. तर त्यांनी संपत्ती अन्य कोणाला विकू नये, तिसऱ्या पक्षाचे अधिकार निर्माण करू नये व बँक खात्यातील रक्कम काढू नये, यासाठी ही नोटीस बजावली आहे,’ असा युक्तिवाद एफटीआयएलच्या वकिलांनी केला.खंडपीठाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईओडब्ल्युने बजावलेल्या नोटीसला अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत याचिकेवरील पुढील सुनावणी २५ जुलै रोजी ठेवली.मंगळवारी ईओडब्ल्युने एफटीआयएलची दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. काहीच दिवसांपूर्वी या कंपनीचा संस्थापक जिग्नेश शहा याला पोलिसांनी मनी लॉड्रींग अ‍ॅक्टअंतर्गत अटक केली आहे. (प्रतिनिधी)