शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिगर ठक्कर यांची आत्महत्या आर्थिक अडचणीतूनच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 03:46 IST

गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्कर (४१) याच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याची...

मुंबई : गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्कर (४१) याच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याची माहिती तिघांच्याही जबाबातून समोर येत आहे. त्याच्या गाडीतून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची अधिक तपासणी सुरू आहे.जिगर ठक्कर यांच्या गाडीवर सुनील सिंग आणि संतोष मिश्रा हे दोघे २० वर्षांपासून चालक म्हणून काम करतात. मंगळवारी सुनील गाडी चालवित होता. अनेकदा कामकाजाबाबत चर्चा करायची असल्यास, गाडी पार्क करून चालकांना ‘बेटा बाहर जाओ’ असे ते सांगत. त्यानुसार, चालक गाडीच्या बाहेर जाऊन थांबत असे. मात्र, ते गाडी सोडून लांब जात नसत. ठक्कर यांनी गाडी सोडताच, ते पुन्हा गाडीकडे येत होते, अशी माहिती संतोष मिश्रा याने दिली.मंगळवारी जिगर यांच्या सांगण्यावरून सुनीलने त्यांची गाडी मरिन प्लाझा येथे पार्क केली. जिगर यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. तो नेहमीप्रमाणे बाहेर जाऊन थांबला, तोच त्यांनी जवळील रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून घेतली. डोक्यात अडकलेली गोळी आणि रिव्हॉल्व्हर पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहे.जिगर ठक्कर याचा मुलगा ध्रुव, भाऊ विशाल आणि चालक सुनील सिंग या तिघांचा जबाब नोंदविला आहे. तिघांच्याही जबाबातून जिगर आर्थिक अडचणीमुळे तणावाखाली होता. त्याच्यावर कोट्यवधीचे कर्ज होते. त्यातच गोसीखुर्द घोटाळ्यातूनही सुटण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर त्यांनी जीवन संपविले.रात्री उशिराने होणार अंत्यसंस्कारघाटकोपर परिसरातील आशीर्वाद बंगल्यात ठक्कर कुटुंबीय राहतात. जिगर यांची बहीण अमेरिकेतून रात्री उशिराने येणार असल्याने, पार्थिवावर रात्री उशिराने अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे.