शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिगरबाज मनीषाने दोन रात्री काढल्या डेथ झोनमध्ये

By admin | Updated: May 24, 2017 23:05 IST

आशिया, युरोप खंड आणि आॅस्ट्रेलियातील अत्युच्च उंचीवर शिखरे सर करून जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 24 - आशिया, युरोप खंड आणि आॅस्ट्रेलियातील अत्युच्च उंचीवर शिखरे सर करून जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठवाड्याची जिगरबाज महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिने तब्बल दोन रात्री डेथ झोन म्हणून ओळखल्या जाणा-या कॅम्प ४ वर काढल्या; परंतु १00 कि. मी. प्रति वेगाने वाहणारे जोरदार वादळ आणि खराब हवामानामुळे तिला मंगळवारी कॅम्प २ वर परतावे लागले. बुधवारी ती बेस कॅम्पवर सुखरूप पोहोचली.
 कॅम्प ४ हे २६ हजार ८५ फूट उंचीवर आहे आणि एव्हरेस्ट शिखराची उंची २९ हजार ३५ फूट आहे. जवळपास दीड महिन्यापासून इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट मनीषा वाघमारे ही एव्हरेस्ट मोहिमेवर आहे. गुरुवारी तिने बेसकॅम्पवरून पहाटे २ वाजता प्रत्यक्ष माऊंट एव्हरेस्ट चढण्यास सुरुवात केली होोती आणि त्यानंतर तिने थेट कॅम्प २ गाठले होते. त्यानंतर तिने यशस्वीपणे कॅम्प ४ यशस्वीपणे गाठले होते. त्याच दिवशी रात्री माऊंट एव्हरेस्टच्या सागर माथ्यावर मार्गक्रमण करण्याच्या तयारीत ती होती; परंतु १00 कि.मी. प्रति वेगवाने वाहणाºया जोरदार वादळामुळे या अडथळ्यामुळे  ती एव्हरेस्टकडे कूच करू शकली नाही.  तिने साऊथकोलकडून मार्गक्रमण करीत एव्हरेस्ट शिखर अवघ्या २00 मीटर अंतरावर असताना तेथपर्यंत मजल मारली; परंतु अचानक हवामान खराब झाल्यामुळे तिला माघार घ्यावी लागली.  मंगळवारीही सकाळपासूनच खराब हवामान होते. त्यामुळे अखेर महिला महाविद्यालयात क्रीडा संचालिका असणाºया मनीषा वाघमारे हिला कॅम्प ४ वरून परतावे लागले आहे. बुधवारी मनीषाला बेस कॅम्पवर पोहोचावे लागले.  त्यामुळे मनीषा जगातील सर्वांत जास्त उंचीवर असणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून तिचे स्वप्न साकार करण्याच्या उंबरठ्यावर होती; परंतु सलग तासन्तास चढाई केल्यामुळे आलेला प्रचंड थकवा पाहून मनीषाचा फिटनेस पाहूनच एव्हरेस्ट चढाईचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिची अचिव्हमेंट खूप मोठी -
जबरदस्त फिटनेस आणि जिद्द दाखवूनही फक्त हवामानाच्या अडथळ्यांमुळे मंगळवारी मनीषा वाघमारे हिला जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करता आले नाही; परंतु तिचे अचिव्हमेंट खूप मोठे असल्याचे मत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एव्हरेस्टवरील कॅम्प ४ याची ओळख ‘डेथ झोन’ अशी आहे. तब्बल ८ हजार मीटर उंचीवर कॅम्प ४ आहे आणि तेथे मायनस ५0 व मायनस ६0 टेम्परेचर असते, तसेच ताशी १00 कि. मी. प्रति वेगाने वादळ वाहत असते. त्यामुळे येथे मानवी शरीर जास्त काळ येथे राहू शकत नाही, असे  आनंद बनसोडे म्हणाले.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही मनीषा वाघमारे हिने ‘माऊंट एव्हरेस्ट शिखर’ करण्यासाठी डेथ झोन समजल्या जाणाºया कॅम्प ४ वर दोन रात्री काढल्या. अशा परिस्थितीत कितीही फिटनेस चांगला असला तरी शरीर तुम्हाला साथ देत नाही. शरीर कमकुवत बनत जाते. त्यामुळे मनीषाची अचिव्हमेंट ही खरोखरीच खूप मोठी आहे, असेही आनंद बनसोडे आणि विनोद नरवडे यांनी सांगितले.
१0 वर्षांत प्रथमच  खराब हवामान-
एव्हरेस्ट शिखरावर एवढे प्रचंड खराब हवामान याआधी कधीही नव्हते. या वेळेस हवामानाचा अंदाज कोणालाच बांधता आला नाही. सर्व हवामानाचे अंदाज या वेळेस चुकले. अशा परिस्थितीत मनीषा वाघमारेने कॅम्प ४ वर दोन रात्र राहून दाखवलेली जिगर ही प्रशंसनीय बाब आहे, असे सुरेंद्र शेळके यांनी सांगितले. सुरेंद्र शेळके हे २0१२ पासून माऊंट एव्हरेस्ट मोहीम करणाºया गिर्यारोहकांना मार्गदर्शन करतात.
अवघे २00 मीटर उरले होते-
मनीषा वाघमारे ही जवळपास जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे माऊंट एव्हरेस्ट गाठले होते; परंतु अवघे २00 मीटर बाकी असताना हिमसख्खलन व वादळी वाºयामुळे सोबत असणाºया शेरपाने माघारी परतण्याचा निर्णय घेतला, असे इंडियन इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनी सांगितले.
माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची अजूनही जिद्द-
खराब हवामानामुळे मंगळवारी एव्हरेस्ट सर करता आले नसले तरी २६ व २७ मे रोजी ओपन विन्डो असल्यामुळे मनीषा वाघमारे हिने अपाण माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द दाखवली आहे. त्याचप्रमाणे तिने बेसकॅम्प ते लुकला यादरम्यान मॅरेथॉनमध्ये धावणार असल्याचे आपल्याला बुधवारी सांगिितले असल्याची माहिती कमांडर विनोद नरवडे यांनी दिली.