शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

झोकात रंगला बोरीचा बार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:40 IST

डफ तुतारीच्या निनादात आणि हलगीच्या कडकडाटात एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत परंपरेप्रमाणे यंदाही ‘बोरीचा बार’ शुक्रवारी उत्साहात साजरा झाला.

लोणंद (जि. सातारा) : डफ तुतारीच्या निनादात आणि हलगीच्या कडकडाटात एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत परंपरेप्रमाणे यंदाही ‘बोरीचा बार’ शुक्रवारी उत्साहात साजरा झाला. एकमेकींना पाऊणतास गावरान शिव्या हासडण्याचा ‘सुखसोहळा’ पार पडल्यावर सुखेड आणि बोरी या दोन्ही गावांतील यात्रांना सुरवात झाली.सातारा जिल्ह्यातील सुखेड आणि बोरी (ता. खंडाळा) या दोन गावांमध्य नागपंचमीच्या दुसºया दिवशी हा बोरीचा बार रंगतो. दोन्ही गावांतील महिला गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ जमतात आणि एकमेकींना शिव्या घालतात. यंदाही हा सोहळा उत्साहात पार पडला. दोन्ही गावातील शेकडो महिलांनी वाजतगाजत ग्रामदेवताचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर वेशीवरच्या ओढ्याच्या कोरड्या पात्रात दोन्ही गावच्या महिला जमल्या आणि ‘बोरीचा बार’ सुरू झाला. गावात सहजपणे एकमेकींना दिल्या जाणाºया शिव्यांपासून सुरू झालेला हा सोहळा रंगत, रंगत शेवटी खास ठेवणीतल्या शिव्यांवर आला. इकडच्या बाजूने शिवी हासडल्यानंतर हलगीचा कडकडाट होणार. त्यानंतर तिकडच्या बाजूने शिवी हासडली जाणार आणि हलगीचा कडकडाट होणार. एकमेकींना हातवारे करीत उस्फूर्तपणे शिव्या देण्यात आल्या.दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी सुरू झालेला शिव्या देण्याचा कार्यक्रम पाऊण तास चालला. जगावेगळा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो लोकांनी गर्दी केली होती. अनेक तरुणांनी सोहळा आपल्या मोबाईलमध्येही कैद केला. या सोहळ्यानंतर दोन्ही गावांमध्ये यात्रेला सुरुवात झाली. लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.महिलांना आवरताना पोलिसांची कसरतडफ-तुतारी आणि हलगीच्या कडकडाटात एकमेकींना शिव्या देणाºया महिलांना आवरताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. बघ्यांची गर्दी, मोबाइलवर फोटो शूटिंग करणाºयांची गर्दी यांना आवर घालताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. यात्रेमुळे बोरीत मिठाईची दुकाने व पाळणे गावात लागले होते.