शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

तब्बल 18 तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा

By admin | Updated: October 4, 2014 23:28 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा काल जल्लोषात साजरा झाला. तब्बल 18 तास रंगलेल्या या सोहळा भाविकांना वेगळीच अनुभूती देऊन गेला.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा काल जल्लोषात साजरा झाला. तब्बल 18 तास रंगलेल्या या सोहळा भाविकांना वेगळीच अनुभूती देऊन गेला. 
सायंकाळी 6 वाजता पेशव्यांच्या इशारतीने सोहळ्याला प्रारंभ झाला. भंडा:याच्या उधळणीत खांदेकरी माणक:यांनी देवाच्या उत्सव मूर्तीची पालखी उचलली. देवाच्या जयघोषात पालखीने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत, पालखी बालदारीत नेण्यात आली. भांडारगृहातून देवाच्या उत्सव मूर्ती सेवेक:यांनी पालखीत ठेवल्या. सोहळ्याने सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच केले. 
भाविकांनी भंडा:याची उधळण केल्याने मावळतीला गडकोटाला सुवर्णनगरीचे स्वरूप आले होते.  मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडकोटाबाहेर आल्यानंतर गडाला प्रदक्षिणा घालून सोहळा रमण्याकडे निघाला. गडाच्या पाठीमागील बाजूस सोहळा विसावला.
दरम्यान, रात्री 9 वाजता मरतड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखीसोहळा ही सीमोल्लंघनासाठी निघाला. 
मद्यरात्री हा सोहळा रमण्यात पोहोचला, तर कडेपठार चा सोहळ्याने सुसरटींगी टेकडी सर केली. रात्री 2 वाजण्याचा सुमारास आतषबाजीत दोन्ही सोहळ्यातील उत्सवमूर्तींची देवभेट झाली आणि सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. देवभेटीचा विलोभनीय सोहळा उरकल्यानंतर जेजुरी गडाच्या पालखीचा सीमोल्लंघनातून सोने लुटण्याचा सोहळा रंगला. 
रमण्यातील तळ्याकाठी सोनेलुटून भाविकांनी उत्सव मूर्तींना अर्पण करून दस:याचे पारंपरिक महत्त्व जपले. सोहळ्याने पहाटे पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास जुन्या जेजुरीमार्गे गावात प्रवेश केला. सोहळा नगरपालिका पटांगणावर पोहोचला. या ठिकाणी रावणदहन करण्यात आले. तेथून मुख्य रस्त्याने गडकोटाकडे निघाला. वाटेत घराघरासमोर महिलांनी रांगोळ्या काढून सोहळ्याचे स्वागत केले. सकाळी 7 वाजता पालखी सोहळा गडाच्या पाय:यांची चढण चढून गडावर पोहोचला. भंडारगृहात उत्सव मूर्ती विसावल्यानंतर पेशव्यांनी रोजमारा वाटप केले. सोहळ्याची सांगता झाली. (वार्ताहर)
 
4नवरात्रची सांगता आणि घराघरांतील घट उठल्यानंतर जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांडेकरी, तसेच बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता. 
4लख्ख प्रकाशात जेजुरी गडाची पालखी डोंगर उतारावरून खालीदरीत रामण्याकडे उतरत होती, तर कडेपठार पालखी सुसरटिंगीच्या टेकडीवर चढत होती. डोंगराळ भाग असल्याने खांदेक:यांना पालखी सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.