शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांना न घेता उडालं जेट एअरवेजचं विमान

By admin | Updated: June 14, 2017 13:49 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना जेट एअरवेज या विमान कंपनीच्या हलगर्जीपणाला सामोरं जावं लागलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - विमान प्रवास करताना राजकीय नेते आणि विमान कंपन्यांमध्ये वादाच्या घटना वाढू लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्याप्रमाणेच खासदार राजू शेट्टी यांचा विमानतळावर जेट एअरवेजच्या कर्मचा-यांबरोबर वाद झाला. आज मुंबई ते दिल्ली असा प्रवास राजू शेट्टी यांना करायचा होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. विमानातून प्रवास करताना राजू शेट्टी यांच्याकडे बोर्डिंग पास असूनही त्यांना विमानातून प्रवास करताच आला नाही. 
 
खासदार राजू शेट्टी बुधवारी सकाळी  6 वाजताच्या विमानाने दिल्लीला जाणार होते. त्यासाठी त्यांनी बिझनेस क्लासचं तिकीट काढलं होतं. तसंच विमानाच्या एक तास आधीच ते विमानतळावरसुद्धा हजर होते. रितसर बोर्डिंग पास घेऊन ते वेळेच्या आधी लॉन्जमध्ये बसले आणि रजिस्टरमध्ये नोंद केली होती. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह कोणीही मदतनीस नव्हता. काही वेळानंतर राजू शेट्टी बोर्डिंग करण्यासाठी लॉन्जच्या बाहेर आल्यावर त्यांना बोर्डिंग द्वार बंद झाल्याचं कळविण्यात आलं.राजू शेट्टी यांनी दिल्लीला एका महत्त्वाच्या बैठकीला जायचं होतं. त्यामुळे त्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानंतर राजू शेट्टी यांना सात वाजताच्या विमानाचं बदली तिकीट दिलं पण त्यासाठी दोन हजार रूपये जेटने घेतले. आपली चूक नसल्याने याबाबत पैसे भरण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला पण जेटने त्यांचं काहीही ऐकलं नाही. अखेरीस त्यांनी पैसे भरले पण त्याची पावती मागितली. पण जेटकडून पावती न मिळाल्याने राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  याप्रकऱणी एअरपोर्ट अथॉरीटीकडे तक्रार करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. पण या प्रकऱणी जेट एअरवेजने अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 
याआधी एअर इंडियाने योग्य वागणूक न दिल्याने शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचा क्रु मेंबर्ससह वाद झाला होता. यावादात रविंद्र गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारल्याचीही घटना घडली. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पर्सनल सिक्युरिटीसह एअर इंडियाने प्रवास नाकारला होता त्यावर राज ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती.