शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर

By admin | Updated: May 4, 2014 14:48 IST

जेईई परीक्षेत झारखंडमधील किशल्य राज ३६0 पैकी ३५0 गुण मिळवत देशात पहिला, तर अकोला येथील कपिल वैद्य याने ३३५ गुण मिळवत राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे.

जेईई मेनमध्ये राज्यात कपिल वैद्य पहिलामुंबई : देशातील आणि राज्यातील अभियांत्रिकी आणि आयआयटीतील विविध व्यावसायिक प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या जेईई मेन या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाला. या परीक्षेत झारखंडमधील किशल्य राज ३६0 पैकी ३५0 गुण मिळवत देशात पहिला, तर अकोला येथील कपिल वैद्य याने ३३५ गुण मिळवत राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, जेईई परीक्षेतील टॉपर्सची नावे अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीत.कपिल वैद्य अकोला येथील दावले कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तर मुंबईतील पेस ज्युनिअर सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ कोठारी ३३१ गुण मिळवत राज्यातून दुसरा तसेच रुपांशू गणवीर हा नागपूर येथील विद्यार्थी मागासवर्गीयांमधून देशात पहिला आला आहे. त्याला ३२८ गुण मिळाले आहेत. नवी मुंबईतील डीपीएस महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धांत गर्ग ३२६ गुण मिळवत राज्यातून चौथा आला आहे.जेईई मेनची पेन आणि पेपरबेस परीक्षा ६ एप्रिल रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. त्यानंतर कम्प्युटर बेस परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला देशभरातून १३ लाख ५६ हजार विद्यार्थी बसले होते. देशभरातून १ लाख ५0 हजार विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी निवडण्यात आले आहेत. ही परीक्षा २५ मे रोजी देशभरात परीक्षा होणार असून, ७ जुलै रोजी ऑल इंडिया रँक घोषित करण्यात येणार आहे........संगणक विज्ञान शाखेत जायचे आहेसुरुवातीला दोन ते तीन तास अभ्यास करत होतो. परीक्षेच्या चार महिन्यांपासून आठ ते नऊ तास अभ्यास करण्यास सुरुवात केली. अ‍ॅडव्हान्स परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास आयआयटी मुंबईत संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे. - पार्थ कोठारी (३३१ गुण)इलेक्ट्रीकल किंवा संगणक विज्ञानसाठी प्रयत्नकाही छोट्या चुकांमुळे गुण कमी झाल्याची खंत आहे. पण अ‍ॅडव्हान्स परीक्षेत अधिक गुण मिळवून आयआयटी मुंबईत इलेक्ट्रीकल किंवा संगणक विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - सिद्धांत गर्ग (३२६)संगणक विज्ञान शाखेत प्रवेश हवापवई आयआयटीमध्ये संगणक विज्ञान शाखेत प्रवेश हवा आहे. येत्या अ‍ॅडव्हान्स जेईई परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी अधिक कष्ट घेईन. - रुपेश गणवीर (३२८)