शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जयप्रभा स्टुडिओ हेरिटेजच राहणार! लता मंगेशकर यांनी याचिका मागे घेतल्याने मिटला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 19:44 IST

कोल्हापूरमधील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ आता हेरिटेजच राहणार हे आता निश्चित झाले आहे. जयप्रभा स्टुडिओवरून राज्य सरकारविरोधात दाखल केलेली याचिका

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - कोल्हापूरमधील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ आता हेरिटेजच राहणार हे आता निश्चित झाले आहे. जयप्रभा स्टुडिओवरून राज्य सरकारविरोधात दाखल केलेली याचिका लता मंगेशकर यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे तब्बल चार वर्षे चाललेल्या कोर्टकचेरीनंतर जयप्रभा स्टुडिओचा वाद आता संपुष्टात आला आहे. जयप्रभा स्टुडिओची व्यावसायिक कारणांसाठी विक्री करण्याचे स्टुडिओच्या सध्याच्या मालकीण पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी २०१२ मध्ये ठरवले होते. मात्र अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने याला विरोध केला. पुढे चित्रपट महामंडळासह व्यावसायिक व कोल्हापूरकरांनीही मोर्चा, आंदोलनांद्वारे साडेतीन एकरांतील हा स्टुडिओ वाचविण्यासाठी प्रयत्न केले होते. पुढे हा वाद न्यायालयात गेला होता. अखेर आज लता मंगेशकर यांनी याचिका मागे घेतल्याने हा वाद संपुष्टात आला. 
अधिक वाचा
(जयप्रभा स्टुडिओला प्रतीक्षा चित्रीकरणाची)जयप्रभा स्टुडिओशी संबंधित अनेकांच्या आठवणी निगडित आहेत. त्यामध्ये भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, दामले-फत्तेलाल, अनंत माने या दिग्गजांसह अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत मांडरे, अरुण सरनाईक, आशा काळे, बेबी शकुंतला, रमेश देव, सीमा देव, राजशेखर ते अलीकडचे भास्कर जाधव, यशवंत भालकर अशा कितीतरी असामींचा समावेश आहे. त्यांची कारकीर्द याच स्टुडिओत घडली आहे.  
दरम्यान, २०१५ साली लता मंगेशकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने जयप्रभा स्टुडियो हेरिटेज असल्याचा निकाल दिला होता.