शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘जयस्तुते’चा ठेका आरोप हाेताच रद्द; मंत्री मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित कंपनी असल्याचा होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:47 IST

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीचा ठेका ग्रामविकास मंत्रालयाने १३ सप्टेंबरलाच रद्द केला आहे.

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीचा ठेका ग्रामविकास मंत्रालयाने १३ सप्टेंबरलाच रद्द केला आहे. त्याचदिवशी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्या पत्रकार परिषदेत जयस्तुते कंपनीबद्दलचा आरोप नव्हता. परंतु, तो भविष्यात होऊ शकतो याची कुणकुण लागल्याने खबरदारी म्हणून आधीच हा करार रद्द केल्याचे कागदपत्रांवरून दिसते. सोमय्या यांनी गुरुवारी त्यासंबंधीची कागदपत्रे पत्रकारांना उपलब्ध करून दिली.सोमय्या यांनी १३ सप्टेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांनी बोगस शेल कंपन्या काढून त्याआधारे १२७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. त्यानंतर गडहिंग्लज कारखाना मुश्रीफ यांच्या जावयाच्या कंपनीकडूनच चालविला जात होता, असा आरोप केला. २८ सप्टेंबरला कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीला १५०० कोटी रुपयांचे राज्यभरातील ग्रामपंचायतींचा टीडीएस भरण्याचे काम दिल्याचा आरोप केला. या कंपनीस ठेका देण्याची मूळ प्रक्रिया ५ मे २०२० ला सुरू झाली. हा ठेका १० मार्च २०२१ ला प्रत्यक्षात देण्यात आला. तो ठेका  रद्द करण्यात येत असल्याचे ग्रामविकास मंत्रालयाच्या १३ सप्टेंबर २०२१ च्या शासन आदेशात म्हटले आहे. मुश्रीफ यांनी या कंपनीस दहा वर्षांचा ठेका दिला होता. कंपनीस वर्षाला १५०० कोटी रुपये मिळणार होते. या कंपनीची स्थापना २०१२-१३ मध्ये झाली असली तरी मुश्रीफ यांच्या जावयाने ही कंपनी आठ महिन्यांपूर्वीच विकत घेतली. गेल्या आठ वर्षांत कंपनीची काहीही आवक नाही. - किरीट सोमय्या, भाजप नेते.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफKirit Somaiyaकिरीट सोमय्या