शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

जयदेव यांना राजचा आधार? ठाकरे संपत्ती वादाचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 05:16 IST

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कथित इच्छापत्र त्यांनी स्वेच्छेने नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे केले आहे

दीप्ती देशमुख,

मुंबई- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कथित इच्छापत्र त्यांनी स्वेच्छेने नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे केले आहे या आपल्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ जयदेव ठाकरे यांनी ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणांच्या सीडी बुधवारी उच्च न्यायालयात सादर केल्याने ठाकरे संपत्तीवरून दोन भावांमध्ये सुरु असलेल्या वादात तिसऱ्या भावालाही न्यायालयात साक्षीसाठी बोलावले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जयदेव यांच्या वकिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१२ मध्ये ठाणे येथे निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ वरील वाढत्या प्रभावासंदर्भात केलेल्या विधानांचा आधार घेत त्या भाषणांच्या सीडी सादर केल्या. पुराव्यांच्या कायद्यानुसार त्या सीडीमधील भाषण आपणच केलेले आहे, हे स्वत: राज ठाकरे यांनी न्यायालयात येऊन शपथपूर्वक सांगितले तरच या सीडी पुरावा म्हणून ग्राहय धरल्या जाऊ शाकतील. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे संपत्तीच्या दाव्यात जयदेव ठाकरेंकडून राज ठाकरे यांना साक्षीदार म्हणून बोलवले जाण्याची दाट शक्यता आहे.बाळासाहेब सतत आजारी पडू लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’वरील वर्चस्व वाढू लागले. सर्व महत्वाचे निर्णय उद्धव ठाकरेच घेऊ लागले. बाळासाहेबांचे मानसिक संतुलन ठीक नसताना वादग्रस्त इच्छापत्र तयार करण्यात आले, असा आरोप जयदेव यांनी याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या या दाव्याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सेंट्रल मैदानावर केलेल्या भाषणाचा आधार घेतला आहे. जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी बुधवारी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सेंट्रल मैदानात २०१२ मध्ये केलेल्या भाषणाची सीडी सादर केली.२००६ मध्ये शिवसेना सोडून स्वतंत्र चूल मांडणारे राज ठाकरे यांनी २०१२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. उद्धव ठाकरे विश्वासार्ह नसल्याची, मातोश्रीवर त्यांचेच चालते, अशी जाहीर विधाने केली होती. >बाळासाहेबांना केलेल सर्व कॉल्स उद्धव ठाकरे उचलतात. बाळासाहेबांपर्यंत निरोप पोहचतच नाहीत आणि याबद्दल बाळासाहेबांकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा सूर राज ठाकरे यांनी २०१२ मध्ये आळवला होता. आता याच टीकेचा फायदा जयदेव यांनी घेतला आहे. जयदेव यांचेही दाव्यात असेच म्हणणे असल्याने त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाच्या सीडी उच्च न्यायालात सादर केल्या आहेत. त्यामुळे ठाकरे संपत्ती वादात राज ठाकरेही साक्षीदार म्हणून हजर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. >उद्धव-राज भेटीचे इंगित : उद्धव व राज ठाकरे यांच्या गेल्याच आठवड्यात ‘मातोश्री’वर झालेल्या भेटीने सगळ््यांच्या भुवया उंंचवल्या. दुरावलेल्या या दोन भावांनी बंद खोलीत भेटण्याने सामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. ठाकरे कुटुंबीयांनी ही भेट ‘कौटुंबिक’ आहे, असे जाहीर करून या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण ठाकरे संपत्ती वादाला जयदेवकडून दिल्या जात असलेल्या वळणाशी तर या भेटीचा संबंध नसावा ना, अशी नवी शक्यता आता चचिर्ली जात आहे.