शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

जयदेव ठाकरे यांची १८ला उलटतपासणी

By admin | Updated: June 21, 2016 03:42 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राला त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. १८ जुलैपासून उच्च न्यायालयात जयदेव ठाकरे यांच्या

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राला त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. १८ जुलैपासून उच्च न्यायालयात जयदेव ठाकरे यांच्या उलटतपासणीला सुरुवात होणार आहे. ही उलटतपासणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वकील घेतील, असे न्या. पटेल यांनी सोमवारी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांनी १३ डिसेंबर २०११ रोजी केलेल्या इच्छापत्राला जयदेव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बाळासाहेबांनी संपत्तीतील बहुतांशी वाटा उद्धव ठाकरे यांना दिला. मात्र, जयदेव यांच्या नावे काहीच ठेवले नाही. जयदेव यांच्या म्हणण्यानुसार, ते बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राहत नसले, तरी त्यांच्या नात्यात दुरावा नव्हता. त्यामुळे बाळासाहेब त्यांना संपत्तीत वाटा देणार नाहीत, हे शक्य नाही. जयदेव यांच्या म्हणण्यानुसार, इच्छापत्र तयार करण्यात आले, त्या काळात बाळासाहेबांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. याचा फायदा घेऊन उद्धव यांनी बाळासाहेबांवर दबाव आणत, संपत्तीतील बहुतांश वाटा स्वत:च्या नावावर करून घेतला.बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर २०१२ मध्ये जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा केला होता. या दाव्याच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे इच्छापत्र तयार करणारे एफ. डिसोझा, डॉक्टर जलील परकार, शिवसेनेचे नेते आणि बाळासाहेबांशी घनिष्ठ संबंध असलेले अनिल परब यांची साक्ष नोंदवली आहे. (प्रतिनिधी) संपत्तीतील वाटा बदलत राहिलाबाळासाहेबांनी अनेक वेळा इच्छापत्र बनवले. मात्र, वारस तेच राहिले, परंतु त्यांच्या नावे देण्यात येणारा संपत्तीचा वाटा सतत बदलत राहिला, अशी साक्ष अ‍ॅड. एफ. डिसोझा यांनी उच्च न्यायालयात नोंदवली.ठाकरे यांनी पहिले इच्छापत्र 1997मध्ये तयार केले. त्यांनतर, आठ ते नऊ वेळा त्यांनी इच्छापत्र बदलले. प्रत्येक वेळी बाळासाहेब इच्छापत्राचा मसुदा त्यांच्या रूममध्ये जाळत असत. अखेरीस 2011मध्ये त्यांनी अंतिम इच्छापत्र तयार केले, अशीही माहिती अ‍ॅड. डिसोझा यांनी उच्च न्यायालयाला दिली.