ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 12 - मुलाला भेटण्यासाठी आलेल्या जावयाने चक्क जाता जाता उस्मानपुरा, फुलेनगरात सासरवाडीतच चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही चोरी करणाऱ्या अनिल तुकाराम त्रिभूवन (३५, रा. सिडको एन-३) या जावयाला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले.कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगिलते की, फुलेनगरातील फिर्यादी द्वारकाबाई जगताप या धुणीभांडी करतात. त्यांचे पती टेलरींगचे काम करतात. त्यांना दोन मुली असून दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. लहान मुलीचा मुलगा द्वारकाबाईकडेच शिक्षणासाठी राहतो. दोन महिन्यांपूर्वी नित्याप्रमाणे द्वारकाबाई सकाळी ९ वाजेच्या सुमारास कामावर गेल्या. त्यांचे पती इंदिरानगरात टेलरींग कामासाठी दुकानावर गेले. घरी मुलीचा लहान मुलगा प्रमोद (१२) हा एकटाच होता. प्रमोदचा वडील असलेला अनिल त्रिभूवन हा एन-३ मध्ये वॉचमन म्हणून काम करतो आणि त्याच बंगल्यात एका खोलीत राहतो. त्या दिवशी प्रमोदला भेटण्यासाठी अनिल आला. मुलाला भेटला. गप्पा मारल्या. त्याचवेळी त्याची नजर सासरवाडीतील कपाटावर पडली. घरी कुणी नाही ही संधी साधून त्याची नियत फिरली आणि त्याने गुपचूप कपाट उघडले. त्यात असलेले चांदीचे कडे, सोन्याची नथ चोरी केली आणि तो निघून गेला.या प्रकरणी काल द्वारकाबाईने फिर्याद दिल्यानंतर उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फौजदार कल्याण शेळके, जमादार नितीन साबळे, संतोष त्रिभूवन, प्रल्हाद ठोंबरे, जनार्धन हरणे यांनी शोध घेऊन अनिल त्रिभूवनला अटक केली. खाक्या दाखविताच त्याने सासूच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले चांदीचे कडे आणि सोन्याची नथही काढून पोलिसांना दिली. मोठ्या मुलीमुळे उघडकीस आला प्रकारदोन दिवसांपूर्वी फिर्यादी द्वारकाबाईची मोठी मुलगी अनीता घरी आली. काही दिवसांपूर्वी लहान बहिणीचा पती अनिलकडे माझ्या नवऱ्याने चांदीचे कडे पाहिले आहेत. ते तुझेच आसावेत, असे ती म्हटली. तेव्हा द्वारकाबार्इंनी कपाट उघडून पाहिले असता कपाटातील चांदीचे कडे आणि एक सोन्याची नथ असा सुमारे दहा हजारांचा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले. आपल्या जावयानेच घरात चोरी केली, हे लक्षात आल्यानंतर द्वारकारबाईने उस्मानपुरा ठाण्यात काल फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.
जावयाने सासरवाडीतच केली 'हात की सफाई'
By admin | Updated: July 12, 2016 21:46 IST