शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जवान थेट एटीएममध्ये... पोलिस मात्र रांगेत !

By admin | Updated: November 16, 2016 23:09 IST

सातारकरांची अनोखी शिस्त : नोटा बदलून घेताना दिसतोय नागरिकांच्या मानसिकतेचा अनोखा आविष्कार

सातारा : कोणी ‘व्हिआयपी’ व्यक्ती असेल तरी त्यांनी रांगेत उभे राहूनच इतरांप्रमाणे कामे करावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र काहीजण रांगा तोडण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण रांगेत उभे राहून आपण सर्वसामान्यच आहोत, हे दाखवून देतात, असाच काहीसा प्रकार साताऱ्यातील एटीएम सेंटरमध्ये पाहायला मिळाला.एका जवानाला ड्युटीवर जायचे होते म्हणून त्या जवानाने रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांना मी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाऊ का, अशी विनंती केली. भल्या मोठ्या रांगेत उभ्या राहिलेल्या सगळ्यांनीच त्या जवानाला एका सुरात हो म्हणून पैसे काढण्यास मुभा दिली. मात्र दुसऱ्या एटीएममध्ये पैसे काढताना एका पोलिसाला या उलट अनुभव आला. मी पोलिस आहे. आत्ताच नाईट ड्युटी करून आलोय. मला पैसे काढण्यासाठी जाऊद्या, अशी विनंती पोलिसाने केली. या ठिकाणी मात्र नागरिकांनी पोलिसाला एटीएममध्ये जाऊ न देता रांगेत उभे केले. या परस्पर घटनांमधून जवानांबाबत सर्वसामान्यांच्या मनात सहानुभूती तर पोलिसांच्याविषयी कुठेतरी राग व्यक्त होत असल्याचे दिसून आले. प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी सकाळपासून लोकांनी पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी एक युवक धापा टाकतच एटीएम सेंटरजवळ आला. भली मोठी रांग पाहून त्याचा चेहरा नर्व्हस झाला. मात्र त्याने मी सैन्य दलात असून मला ड्युटीवर जायचे आहे, अशी एका व्यक्तीला त्याने विनंती केली. त्या व्यक्तीने मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही मागे रांगेत उभ्या राहिलेल्या लोकांना विचारा, असा सल्ला दिला. त्यानंतर त्या जवानाने रांगेतील सर्व लोकांनाही अशीच विनंती केली. त्याच्या विनंतीला तत्काळ सर्व नागरिकांनी होकार दिला. त्या जवानाने एटीएम सेंटरमधून पैसे काढून बाहेर आल्यानंतर जाताना त्याने रांगेतउभ्या राहिलेल्या लोकांना सलाम ठोकून आभार व्यक्त केले. सैन्य दलातील जवानांविषयी सर्वसामान्य नगरिकांच्या मनात नेहमीच आदराची भावना आणि कुतूहल असते. त्यामुळे या जवानाला लाईन तोडून पैसे काढण्यास नागरिकांनी मुभा दिली. परंतु पोलिसांना मात्र याउलट वेगळचा अनुभव समाजात येत आहे. (प्रतिनिधी)