शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीने संशयावरुन तरुणाला केला २ लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 19:22 IST

उस्मानाबाद, दि. 11  : एका इसमाविरूध्द जात पंचायत बसवून दोन लाखाचा दंड ठोठावत दंड न भरल्यास जातीतून वाळीत टाकू, असा निर्णय देणा-या जात पंचायतीच्या अध्यक्षासह पाच जणांविरूध्द गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मागील एक महिन्यापूर्वी उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर भागात घडली होती़शहरातील साठे नगर ...

उस्मानाबाद, दि. 11  : एका इसमाविरूध्द जात पंचायत बसवून दोन लाखाचा दंड ठोठावत दंड न भरल्यास जातीतून वाळीत टाकू, असा निर्णय देणा-या जात पंचायतीच्या अध्यक्षासह पाच जणांविरूध्द गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मागील एक महिन्यापूर्वी उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर भागात घडली होती़शहरातील साठे नगर भागात राहणारे रजनीकांत अशोक पवार हे रिक्षा चालवून कुटुंबाची उपजिविका भागवितात़ मागील दीड महिन्यापूर्वी रजनीकांत पवार याने रिक्षातून एका महिलेला कारागृहाजवळ सोडले होते़ रिक्षाचे भाडे नंतर देते असे सांगून त्या महिलेने त्यांचा मोबाईल नंबर घेतला होता़ नंतर भाड्याचे पैैसे घेऊन जा, म्हणून दोन-तीन वेळा फोन केला होता़ या कारणावरून सुनिल उध्दव चव्हाण याने संशय घेऊन मागील एक महिन्यापूर्वी पापनाश नगर भागात अप्पा तात्या पवार यांच्या घरासमोर रजनीकांत पवार विरूध्द जात पंचायत बसविली होती़ जात पंचायतीचे अध्यक्ष अप्पा तात्या पवार हे होते़ तर झिंग्या सरदार पवार, राजेंद्र जिमा काळे, ज्ञानेश्वर काळे (सर्व रा़ उस्मानाबाद) व सुनिल उध्दव चव्हाण हे सदस्य होते़.

या पंचायतीत रजनीकांत पवार याला दोन लाख रूपयांचा दंड लावण्यात आला़ दंड नाही भरला तर जातीतून वाळीत टाकून समाजापासून बहिष्कार टाकू, असा निर्णय देण्यात आला होता़.  त्यानंतर रजनीकांत पवार याने त्याच्या आईकडून २० हजार रूपये घेऊन सुनिल चव्हाण याला दिले़ नंतर रिक्षा विकून आईला पैैसे परत केले होते, अशी फिर्याद रजनिकांत पवार याने शहर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून जातपंचायतीचे अध्यक्ष अप्पा तात्या पवार, सुनिल उध्दव चव्हाण, झिंग्या सरदार पवार, राजेंद्र जिमा काळे, ज्ञानेश्वर काळे (सर्व रा़ पापनाशनगर, उस्मानाबाद) यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१६ या कायद्यानुसार गुन्ह दाखल करण्यात आला आहे़ तसेच खंडणीचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे़ तिघे पोलिसांच्या ताब्यातजात पंचायत बसविणाºया पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल होताच पोनि सुनिल नेवासे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोहेकॉ संजय सूर्यवंशी, पोना दीपक नाईकवाडी, पोहेकॉ पी़ए़आहेर यांनी कारवाई करीत अप्पा पवार, ज्ञानेश्वर काळे, झिंग्या पवार या तिघांना ताब्यात घेतले़ इतरांचा शोध सुरू असून, ताब्यातील तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोनि सुनिल नेवासे यांनी दिली़