शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जनसागर लोटला

By admin | Updated: November 3, 2014 00:46 IST

कुटुंबातील व्यक्तीने कर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर सर केल्यावर त्याच्या स्वागतासाठी जशी घरची मंडळी आपुलकीने अन् जिव्हाळ्याने प्रतीक्षेत उभी राहतात नेमकी हीच भावना उराशी बाळगून

नागपूर: कुटुंबातील व्यक्तीने कर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर सर केल्यावर त्याच्या स्वागतासाठी जशी घरची मंडळी आपुलकीने अन् जिव्हाळ्याने प्रतीक्षेत उभी राहतात नेमकी हीच भावना उराशी बाळगून नागपूरकर मंडळी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रथम नगरगमनाला स्वागतासाठी रस्त्यावर उभी होती.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच नागपूर नगरीत आलेले विदर्भाचे चौथे आणि नागपूरचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हजारो नागपूरकरांनी अभूतपूर्व स्वागत केले.रडायचं नाही लढायचं !जनतेच्या अपेक्षा खुप आहेत. अनेक कामे करायची आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखविलेल्या मार्गाने राज्य करू, रडायचं नाही तर लढायचं या विचाराने मैदानात उतरू आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करू. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीतरुणाईचा उत्साहदेवेंद्र फडणवीस यांच्या रूपात नागपूरचा एक तरुण राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद शहरातील तरुणांना अधिक झाल्याचे स्वागत मिरवणुकीच्या निमित्ताने दिसून आले. भाजपच्या युवा फळीतील कार्यकर्त्यांसोबतच गैर राजकीय क्षेत्रातील तरुण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्यातीलच एक तरुण मुख्यमंत्री झाल्याची भावना या सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होती. फडणवीस यांचे आगमन दुपारी ४ वाजता होणार होते. मात्र दुपारी २ वाजतापासूनच कार्यकर्त्यांनी विमानतळावर गर्दी केली होती. स्वखर्चाने प्रवासमुख्यमंत्री झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील साधेपणा कायम ठेवला आहे. त्यांनी रविवारी मुंबई-नागपूर विमान प्रवास हा स्वखर्चाने केला. वास्तविक मुख्यमंत्री म्हणून सरकारी विमानाची सेवा त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचा वापर ते नागपूरला येण्यासाठी करू शकले असते. पण त्याला फाटा देत फडणवीस यांनी खासगी प्रवासी विमान कंपनीच्या विमानाने ‘इकॉनॉमिक क्लास’ मध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला व तिकिटाचा खर्चही स्वत: उचलून एक नवा आदर्श त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या पुढे ठेवला. स्वागत मिरवणुकीत या गोष्टीची चर्चा होती.