शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

जान्हवीला २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: June 13, 2015 03:25 IST

मद्यधुंद अवस्थेत उलट्या दिशेने गाडी चालवत एका टॅक्सीला उडवून दोघा जणांचा बळी घेणाऱ्या जान्हवी गडकरला शुक्रवारी कुर्ला न्यायालयाने

मुंबई : मद्यधुंद अवस्थेत उलट्या दिशेने गाडी चालवत एका टॅक्सीला उडवून दोघा जणांचा बळी घेणाऱ्या जान्हवी गडकरला शुक्रवारी कुर्ला न्यायालयाने २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दंडाधिकारी ऋचा खेडेकर यांनी हा निकाल दिला. न्यायालयीन कोठडीत येताच जान्हवीचे वकील अ‍ॅड. महेश सबनीस यांनी जामीन अर्ज सादर केला. त्यावर तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी म्हणणे मांडण्याचे आदेश देत दंडाधिकारी खेडेकर यांनी या प्रकरणाची सुनावणी १५ जूनपर्यंत तहकूब केली. जामीन मिळेपर्यंत जान्हवीची रवानगी भायखळा येथील महिला कारागृहात करण्यात आली आहे. येथे विविध गुन्हयात सहभागी असलेल्या महिला गुन्हेगारांसोबत तिला राहावे लागेल.जान्हवीची रडारडआरसीएफ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास जान्हवीला न्यायालयात आणले. यावेळी तिला पाहाण्यासाठी बरीच गर्दी न्यायालयाच्या आवारात होती. पोलिसांच्या गाडीभोवती या गर्दीने वेढा दिला. त्यात जान्हवीचे फूटेज, फोटो माध्यम प्रतिनिधींनीही परिसर डोक्यावर घेतला. व्हरांडयातून न्यायालयात येईपर्यंत या गर्दीने जान्हवीची पाठ धरली. कुतुहलापोटी दंडाधिकारी खेडेकर यांचे न्यायदालन हाऊसफुल्ल होते. हा सर्व प्रकार पाहून जान्हवीला रडू फुटले. सरकारी वकील अ‍ॅड. महाजन यांनी सुरूवातीलाच जान्हवीची पोलीस कोठडी वाढवावी ही विनंती करताच जान्हवी ओक्साबोक्शी रडू लागली. तिचे वकील अ‍ॅड. सबनीस यांनी तपासासाठी पोलिसांना पुरेसा अवधी मिळाला आहे. ती कुठून निघाली, अपघात कुठे घडला ही सर्व माहिती पोलिसांनी मिळवली आहे. जान्हवीही या अपघातात जखमी झाली असून तिला पोलिसांपेक्षा कुटुंबाकडून चांगल्या दर्जाचे उपचार मिळू शकतील, असा युक्तिवाद केला.