शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात नागपंचमीच्या दिवशीच सर्पमित्रास सर्पदंश

By admin | Updated: August 7, 2016 21:46 IST

भागवत देवराम धनगर (४५, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, जि.जळगाव) या सर्पमित्रालाच नागपंचमीच्या दिवशी सापाने दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 7-  घरात निघालेल्या सापाला पकडून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी गेलेले भागवत देवराम धनगर (४५, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, जि.जळगाव) या सर्पमित्रालाच नागपंचमीच्या दिवशी सापाने दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या शिवाय आणखी इतर दोघांना आजच सर्पदंश झाल्याच्या घटना जिल्ह्यात वेगवेगळ््या ठिकाणी घडल्या. शेंदुर्णी येथील भागवत धनगर हे सर्पमित्र असून परिसरात कोठे साप निघाल्यास तेथे जाऊन ते त्याला पकडून सुरक्षित स्थळी हलवितात. अशाच प्रकारे ७ आॅगस्ट रोजी ऐन नागपंचमीच्या दिवशी गावातीलच समाधान रघुनाथ बारी यांच्या घरात सकाळी सहा-साडेवाजेदरम्यान साप निघाला. त्यावेळी धनगर यांना साप पकडण्यासाठी बोलविण्यात आले. तेथे गेल्यानंतर या सर्पमित्राने काठीच्या साहाय्याने साप पकडलाही. मात्र सापाच्या फणा मागे पकडलेले असलेले तो अचानक उलटला व त्याने धनगर यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दंश केला. साप विषारी असल्याने क्षणातच विष त्यांच्या रक्तात पसरले व त्यांना त्रास जाणवू लागला. त्यावेळी त्यांना तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवून उपचार सुरू करण्यात आले. रात्रीपर्यंत त्यांना आॅक्सिजन लावण्यात (व्हेंटीलेटरवर) आले होते. दरम्यान असोदा, ता. जळगाव येथील रमेश कडू माळी (५७) व आव्हाणे, ता. जळगाव येथील राजेंद्र प्रताप पाटील (४१) या दोघांनाही नागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झाला. त्यांच्यावरदेखील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.