जळगाव : खान्देशच्या शिरपेचात सोमवारी एक मानाचा तुरा खोवला गेला. कष्टकरी आणि वंचित समूहाचे प्रतिनिधित्व करणारे लासूरचे (ता. चोपडा) चित्रकार आणि साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथनपर पुस्तकाला २०२५चा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. हा पुरस्कार २४ भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी दिला जातो. पुरस्कारांचे वितरण ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
संयत विद्रोहाची सत्यकथाबाविस्कर हे जळगाव येथील पी. एम. मुंदडा शाळेतून चित्रकला शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. गावकुसाबाहेरच्या माणसांचे जगणे चित्रित करून, कधी बँडवाला, तर कधी टोपल्या विणणारा असा हा राजू नावाचा युवक आयुष्याशी दोन हात करत धैर्याने प्रवास करतो. बाविस्कर यांची झालेली उपेक्षा आणि अवहेलना काळीज चिरणारी आहे. आत्मभान आणि आत्मशोध याचा नेमका अर्थ लावून आत्मचिंतन करणारी आणि संयत विद्रोह व्यक्त करणारी ही सत्यकथा आहे.
काळ्यानिळ्या रेषा हा दुर्लक्षित समूहाच्या वेदनांचा आक्रोश आहे. या आत्मकथेतून या दुर्लक्षित समूहाचे कष्टमय जगणं आपण मांडले आणि त्याची साहित्य अकादमीने दखल घेतली. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.राजू बाविस्कर, लेखक
परीक्षक मंडळामध्ये कोण?मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी नियुक्त परीक्षक मंडळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले, नागोराव तम्माजी उटकर आणि राजन गवस यांचा समावेश होता.
Web Summary : Raju Baviskar, a Jalgaon-based writer, receives the 2025 Sahitya Akademi Award for his autobiographical book 'Kalyanilya Resha,' depicting the struggles of marginalized communities. The award includes ₹1 lakh and a memento.
Web Summary : जलगाँव के लेखक राजू बाविस्कर को उनकी आत्मकथा 'काळ्यानिळ्या रेषा' के लिए 2025 का साहित्य अकादमी पुरस्कार मिला, जिसमें वंचित समुदायों के संघर्षों को दर्शाया गया है। पुरस्कार में ₹1 लाख और स्मृति चिन्ह शामिल हैं।