ऑनलाइन लोकमत
जैतापूर, दि. १४ - अणूऊर्जा प्रकल्पामुळे कोकणातील जैतापूर गाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले. अणूऊर्जा प्रकल्पामुळे गावचा विकास वेगाने होईल असे सरकारकडून स्वप्न दाखवण्यात आले. प्रत्यक्षात विकास तर दूर राहिला पण या गावातील लोकांना पिण्यायोग्य पाणीही मिळत नाहीय. त्यामुळे गावच्या लोकांचे हाल होत आहेत.
जैतापूर गाव समुद्र किना-याजवळ गावातील विहीरीचे पाणी बेचव झाले आहे. जैतापूर ग्रामपंचायतीतर्फे राबवण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेचे बारा वाजले आहेत. जैतापूर ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या मतभेदांमुळे गावक-यांचे मात्र हाल होत आहेत.
शेजारी असलेल्या होळी गावानेही राजकीय मतभेदांमुळे जैतापूरला पाणी द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे 'कोणी पाणी देता का पाणी' असे म्हणण्याची वेळ गावक-यांवर आली आहे. आपल्या या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गावक-यांनी विधान परीषदेच्या आमदार मा.सौ.हुस्नबानु खलिपे यांच्याशी चर्चा केली आहे.