शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

जय पराजय डोक्यात ठेवणारा राजकारण करू शकत नाही - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 17:22 IST

सोलापूर जिल्ह्याने मला लोकसभेसाठी सर्वसाधारण जागेसाठी तीन वेळा निवडून दिले. पण हा मतदार संघ राखीव झाल्याने मला जनतेने धक्का दिला.

ऑनलाइन लोकमत
मंगळवेढा, दि. 10 -  सोलापूर जिल्ह्याने मला लोकसभेसाठी सर्वसाधारण जागेसाठी तीन वेळा निवडून दिले. पण हा मतदार संघ राखीव झाल्याने मला जनतेने धक्का दिला. जयपराजय न पाहता मी तिसºया दिवशी कामे करण्यास सुरुवात केली. जय पराजय हा डोक्यात ठेवणारा तो राजकारण करु शकत नाही. ४० वर्षात हा पहिला पराभव झाला. जनतेकडून अमृत मिळते, त्यामुळे मी थकत नाही. मी साधा माणूस आहे. जोपर्यत परश्वेराची कृपा आहे, तोपर्यत मी चालतच राहतो. त्यात खंड पडत नसल्याचे मत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवेढा शहर व तालुक्याच्या वतीने आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. सुधाकरपंत परिचारक होते. यावेळी आ. भारत भालके, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, नगराध्याक्षा राखी कौडूभैरी, आ. रामहरी रुपनवर, प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस धर्मा भोसले, ह.भ.प. बोधले महाराज, भाऊसाहेब रुपनर, नगरसेवक चेतन नरुटे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा, जि.प.सदस्य शिवाजीराव नागणे, जिल्हा दुध संघाचे संचालक औदुबर वाडदेकर, सभापती गुरुसिध्दाप्पा म्हेत्रे, धनश्रीचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, अध्यक्षा प्रा. शोभा काळुंगे, सुरेश कोळेकर उपस्थित होते.
माजी मंत्री शिंदे म्हणाले की, तुम्ही नाराज होवू नका. ४० वर्षात चुकलो नाही, एखादी चूक होते. मुलासी वडीलांनी एखादी चूक केली म्हणून वाईट वाटायचे कारण नाही. मी रात्रीच्या शाळेत शिकलेलो आहे. शिक्षणाचे पावित्र्य ढासळू देऊ नये. मंगळवेढ्यात सुरेख रत्न आहेत. पंढरपूर-विजापूर रेल्वेमार्ग मी मंजूर केला आहे तो अद्याप सुरु केला नाही. सत्ता असो अथवा नसो, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे सांगितले. यावेळी कवी प्रकाश जडे, शिवाजी सातपुते, इंद्रजित घुले, अशोक उन्हाळे यांच्या सत्कार करण्यात आला. 
यावेळी आ. गणपतराव देशमुख, माजी आ. सुधाकरपंत परिचारक, आ. रामहरी रुपनवर, ह.भ.प. बोधले महाराज, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी  डॉ. मिनाक्षी कदम, डॉ. सुजित कदम, मुबिना मुलाणी, जयराम आलदर, बाबा कोंडूभैरी, तानाजी काकडे, शिवाजीराव पवार, नगरसेवक महादेव जिरगे, प्रविण खवतोडे, अजित जगताप, चद्रकांत पडवळे, डॉ. सुभाष कदम, ज्ञानदेव जावीर, अविनाश शिंंदे, खंडू खंदारे, कल्पना गडदे, दिपाली काळुंगे, राजलक्ष्मी गायकवाड, मनोहर कलुबर्मे, ईश्वर गडदे, व्यवस्थापिका सुनिता सावंत उपस्थित होत्या. प्रस्ताविक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले. सुत्रसंचालन नागेश साळुंखे यांनी केले. संतोष पवार यांनी आभार मानले.