शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या जैन साधू-साध्वींना नमन

By admin | Updated: May 23, 2017 03:20 IST

दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याचेही धाडस कुणीच करत नाही, मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन साधू-साध्वी याला अपवाद आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याचेही धाडस कुणीच करत नाही, मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन साधू-साध्वी याला अपवाद आहेत. सूर्य कितीही आग ओकत असला, तरीही ते रोज अनवाणी पायाने बाहेर पडतात. या त्यांच्या सहनशीलतेला सर्वच जण नमन करतात.कडक उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असली, तरी यामुळे जैन साधू-साध्वींच्या दिनचर्येत कोणताही फरक पडत नाही. आपण एसी खोलीमध्ये बसून वाढलेल्या तापमानाबाबत रडगाणे गात असतो, पण जैन साधू-साध्वींची दिनचर्या नेहमीसारखीच असते. ते दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये गोचरी-भिक्षाचर्या करण्यासाठी अनवाणी बाहेर पडतात. त्यांना पाहून लोकांना प्रचंड आश्चर्य वाटते. एवढ्या कडक उन्हात व तापलेल्या रस्त्यांवर ते कसे चालत असतील, असा प्रश्न पडून सर्वांच्याच माना श्रद्धेने झुकतात.जैन साधू-साध्वी भगवान महावीर स्वामी यांच्या मार्गावर चालत आहेत. त्यांना बाहेर संचार करताना कष्ट होऊ नये, हीच प्रार्थना भाविक करतात. त्यांच्यावर देवाची कृपादृष्टी सतत राहो. अनेक भाविक भगवान महावीर यांचा मार्ग आत्मसात करण्यासाठी जैन साधू-साध्वींसोबत चालायला लागतात.