मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे वादग्रस्त निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयात सहसचिव पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पी. के. जैन, उपमन्यू चॅटर्जी अथवा संजीवनी कुट्टी यापैकी एकाची नियुक्ती केली जाऊ शकते. मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांची दिल्लीत बदली करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र तशी शक्यता धूसर असल्याचे समजते.मलिक यांच्या नियुक्तीचे आदेश अजून राज्य सरकारला प्राप्त झालेले नाहीत. हे आदेश प्राप्त झाल्यावर त्यांना सध्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. त्यानंतर नवी नियुक्ती होईल. दिल्लीत प्रतिनियुक्तीवर असलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांपैकी एकाची या पदावर नियुक्ती होण्याचे संकेत आहेत. त्यानुसार जैन, कुट्टी अथवा चॅटर्जींचा विचार केला जाईल. तुलनेने तरुण अधिकाऱ्याला दिल्लीत पाठवण्याचा निर्णय झाला तर दिल्लीत जाण्याची तयारी दाखवलेले पुणे भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक रुपिंदर सिंग यांची नियुक्ती होईल, असे समजते. (विशेष प्रतिनिधी)
बिपीन मलिक यांच्या जागी जैन, चॅटर्जी की कुट्टी?
By admin | Updated: January 13, 2015 05:35 IST