शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

थापाबंदी आणल्यास तुरुंगात दिसाल, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 04:01 IST

जनतेला भुलवून सत्तेत येणे ही थापच आहे. गोवंश हत्याबंदीसारखी थापाबंदी केली, तर सध्याच्या सत्ताधा-यांपैकी अनेकांना तुरुंगात जावे लागेल. छप्पन इंची छाती असली, तरी त्या छातीत कोणतेही शौर्य दिसत नाही, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : जनतेला भुलवून सत्तेत येणे ही थापच आहे. गोवंश हत्याबंदीसारखी थापाबंदी केली, तर सध्याच्या सत्ताधा-यांपैकी अनेकांना तुरुंगात जावे लागेल. छप्पन इंची छाती असली, तरी त्या छातीत कोणतेही शौर्य दिसत नाही, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केला.सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी सध्याच्या सरकारपेक्षा कालचा गोंधळ बरा होता, अशी टीका केली. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अहमदाबादमध्ये रोड शोसाठी नेण्यापेक्षा श्रीनगरच्या लाल चौकात त्यांचा रोड शो केला असता आणि तिरंगा फडकवला असता, तर मोदींचा अभिमान वाटला असता, पण तिरंगा फडकविण्याऐवजी ते पतंग उडवित बसले, असेही उद्धव यांनी सुनावले.नार्वेकर यांना बढतीशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे नवे सचिव असतील. या आधी हे पद खा. विनायक राऊत यांच्याकडे होते. सूरज चव्हाण हे युवासेनेचे नवे सचिव असतील.गडकरींना केले लक्ष्यदक्षिण मुंबईत नौसेनेचे काय काम आहे, त्यांनी सीमेवर जावे, असे सुनावणारे केंद्रीय भृपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना ठाकरेंनी त्यांच्या भाषणात लक्ष्य केले. ते म्हणाले की, गडकरी जे बोलले, ते तळपायाची आग मस्तकात नेणारे आहे. सरकारमध्ये आहेत, म्हणून ही मस्ती आहे. गडकरींनी नौसेनेची जाहीर नालस्ती व अवहेलना केली.कानडी गीत गाणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना ठाकरे यांनी शब्दांचे फटकारे लगावले. अमित शहांमुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. त्या मंत्रिपदाचे चांगले काहीतरी करा. माझा कानडीला विरोध नाही, पण कानडींच्या अत्याचारास विरोध आहे. पाटील यांना इतकेच कानडीचे प्रेम असेल, तर तिकडे जा अन् करा नाटक, असेही त्यांनी सुनावले.ते अदृश्य हात सापडू द्या, सेना त्यांची होळीच करेल!-भीमा कोरेगावमधील हिंसाचाराचा उल्लेख करून त्यांनी या दंगलीमागे काही अदृश्य हात असल्याची चर्चा असल्याचे नमूद केले. ते हात कोणाचे आहेत याची कल्पना आहे, पण प्रत्यक्षात ते हात दिसतील, त्या दिवशी त्या हातांची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही.या निमित्ताने जातीपातीचे राजकारण करणाºयांना सेना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सुनावले. जातीपातीच्या नावावर मराठी माणसात कोणी फूट पाडू नका. आपण फुटलो, तर आणखी कोणी औरंगजेब येईल आणि महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे तुकडे करेल, असे उद्धव म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAditya Thackreyआदित्य ठाकरे