मुंबई : भाजपाचे आमदार शपथ घेताना ‘जय विदर्भ’चा घोष करीत असल्याबद्दल हंगामी अध्यक्ष जिवा पांडू गावित यांनी असे म्हणणा:या सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले जाईल, अशी तंबी दिली खरी, पण काही वेळाने ती मागे घेतली. या निमित्ताने आधीच कटूता अनुभवत असलेल्या भाजपा-शिवसेना सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
विशेष अधिवेशनाच्या मंगळवारी दुस:या दिवशी सदस्यांचा शपथविधी सुरू असताना गावित यांनी सोमवारी काही सदस्यांनी शपथ घेताना ‘जय विदर्भ’ म्हटले ते योग्य नव्हते. महाराष्ट्राच्या अखंडतेचा अपमान करणारे असे शब्द कामकाजातून काढून टाकले जातील, असे सांगितले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘जय विदर्भ’ असे शब्द शपथविधीत वापरले जात असल्याबद्दल तीव्र विरोध दर्शविणारे पत्र आपल्याला दिले आहे, असे गावित म्हणाले.
‘जय विदर्भ’ वगैरे उल्लेख केला तर अधिवेशन संपेर्पयत सदस्याला निलंबित केले जाईल, असे अध्यक्ष गावित यांनी म्हणताच भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली. अध्यक्षांनी खरेच कोणाला निलंबित केले तर बुधवारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पंचाईत होईल,हा धोका भाजपाला दिसल्याने नंतर कोणत्याही सदस्याने ‘जय विदर्भ’ म्हटले नाही. 1क् मिनिटांनी गावित यांनी आधी दिलेली तंबी मागे घेतली. (विशेष प्रतिनिधी)
च्शिवसेनेच्या सदस्यांनी गावित यांच्या भूमिकेचे बाके वाजवून जोरदार स्वागत केले आणि शपथविधी सुरळीत सुरू झाला. मात्र भाजपाचे आशिष देशमुख यांनी ‘जय विदर्भ’चा घोष केल्यानंतर पुन्हा तणाव वाढला. विदर्भातील भाजपाच्या बहुतेक आमदारांनी देशमुख यांचे अभिनंदन केले.