लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी डॉ. जगदीश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांनी हा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.डॉ. पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास,सोलापूर जिल्हाधिकारी, राज्य पर्यटन विकास महामंडळ, बेस्टचे महाव्यवस्थापक अशा विविध पदांवर काम केले आहे. १९९१ मध्ये केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोकण विभागात पर्यटन आणि फलोत्पादनाच्या क्षेत्रात विशेष काम करण्यास वाव असल्याचे सांगितले.
कोकण आयुक्तपदी जगदीश पाटील रुजू
By admin | Updated: June 8, 2017 06:35 IST