शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

राजीनाम्याची मागणी केल्याने आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: April 25, 2017 23:47 IST

हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 25- हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नैराश्येपोटी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असले तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. 
मीनल अशोकराव देशमुख (वय २८, रा. अनंतानगर, लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळची विदर्भ) असे त्या तरुणीचे नाव आहे. ती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती. येत्या १८ मे रोजी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे काही दिवसांपासून ती रजेवर होती. मीनल व प्रियांका या दोघी बहिणी येथील सदनिकेत भाड्याने राहत होत्या. सोमवारी प्रियांका तिच्या कामाला निघून गेली; मात्र तब्येत बिघडल्याने ती दुपारी एकच्या सुमारास घरी आली. तिने दाराची बेल वाजवली; परंतु तिला खोलीतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. विवाह जवळ आला असल्याने सुटीवर असलेली मीनल घरीच असे. बेल वाजवल्यानंतर बराच वेळ प्रतीक्षा करूनही प्रतिसाद न आल्याने प्रियंकाने  याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडला. आत खोलीत प्रवेश करताच, दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेली मीनल दिसून आली. तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 
 
 परफॉर्मन्स समाधानकारक नाही. त्यामुळे राजीनामा द्यावा, असा कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी मीनलला तगादा लावला होता. स्वत:हून राजीनामा दे अथवा कंपनी व्यवस्थापनाला कारवाई करणे भाग पडेल, असे तिला धमकावले जात असल्याने तिला नैराश्य आले होते. असे मीनलची बहीण प्रियंका हिचे म्हणणे आहे. प्रियंकाच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्ह दिसून येत आहेत. या घटने नंतर पोलिसांनीही कमालीची गुप्तता बाळगली असल्याने संशय बळावला आहे.
कंपनीतील असुरक्षिततेचे काय?
 
हिंजवडीत रसिला राजू ओपी या आयटी अभियंता तरुणीचा तीन महिन्यांपूर्वी कंपनीत खून झाला. तत्पूर्वी तळवडे सॉफटवेअर कंपनीत काम करणाºया अंतरा दास या तरुणीच्या खुनाची घटना घडली होती. आयटी क्षेत्रात काम करणाºया युवतींचे आत्महत्येचे प्रमाण वाढू लागल्याने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला होता. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महिला सुरक्षा अभियान उपक्रम राबवून आयटीतील तरुणींशी थेट संवाद साधला होता. त्या वेळी बाहेरील सुरक्षिततेच्या उपाययोजना पोलिसांकडून केल्या जात आहेत. परंतु, कंपनीत काही त्रास असेल तर युवतींनी सांगावे, असेही शुक्ला यांनी सांगितले होते. मात्र, कोणीही आतापर्यंत अशी तक्रार दिली नव्हती़