शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

कुत्र्याचा जीव घेणे महागात पडले...

By admin | Updated: June 28, 2016 13:55 IST

काठीचा फटका मारल्याने कुत्र्याचा जीव गेल्याने औरंगाबादमध्ये एका तरूणावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. २७  -  माणूस मारला म्हणून एकाला अटक...वाघ मारला म्हणून एका जणावर गुन्हा दाखल झाला, अशा घटना आपण नेहमीच वाचतो आणि एकतो... परंतु एखाद्या कुत्र्याला काठी, दगड मारला तर त्याच काय ऐवढे विशेष, असे कुणीही म्हणेल. मात्र, शेजाऱ्याच्या कुत्र्याच्या पिल्लाला साधी काठी मारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. काठीच्या एकाच फटक्यात  पिल्लाचा जीव गेला अन् या तरुणावर प्राण्याच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला. ही घटना घडली ती औरंगाबादेतील मुकुंदवाडी परिसरातील जे सेक्टरमध्ये...कुत्र्याची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव शुभम मधुकर काळे (२२, रा. जे सेक्टर, मुकुंदवाडी) असे आहे. त्याचे झाले असे की, जे सेक्टरमधील रहिवासी अंजली भाऊलाल गणवास यांनी काही दिवसांपूर्वी एक सुंदर कुत्र्याचे पिल्लू आणले. या पिल्लाला त्यांनी पाळले. गणवास कुटुंबाला या पिल्लाचा चांगलाच लळा लागला होता. ते कुटुंबातील एक सदस्यच बनून गेले होते. मात्र, हे कुत्र्याचे पिल्लू काही शेजाऱ्यांच्या डोक्याला ताप बनले होते. शेजाऱ्यांच्या अंगणात जाऊन ते घाण करीत असत. रात्री भुंकत असे, त्यामुळे काही जण वैतागून गेले होते. दरम्यान, २६ जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास अंजली गणवास या खरेदीसाठी बाहेर गेल्या. त्यांचे कुत्र्याचे पिल्लू घरी एकटेच होते. खेळत खेळत हे पिल्लू शेजारी राहणाऱ्या काळे कुटुंबाच्या अंगणात गेले आणि तेथे त्याने घाण केली. त्याच वेळी शुभम काळे हा घरातून बाहेत आला. त्या पिल्लाने घरासमोर घाण केल्याचे पाहताच त्याचे माथे भडकले. बाजूला पडलेली काडी त्याने उचलली आणि एक जोरदार फटका त्या पिल्लाला मारला... एकाच फटक्यात ते पिल्लू जमिनीवर कोसळले आणि क्षणातच गतप्राण झाले. नंतर शुभम तेथून निघून गेला.पावणे सात वाजेच्या सुमारास अंजली गणवास खरेदी करून घरी परत आल्या. दरवाजासमोरच आपले कुत्र्याचे पिल्लू निपचित पडलेले त्यांच्या नजरेस पडले. ते झोपले असावे, असे आधी त्यांना वाटले. जवळ जाऊन त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काही हलेना. तेव्हा ते मरण पावलेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

प्रकरण पोलीस ठाण्यातआपल्या कुत्र्याला पिल्लाला आपण घरी नसल्याची संधी साधून कुणी तरी हेतुपुरस्सर मारून टाकले, याची अंजली गणवास यांना खात्री पटली. मग त्यांनी शेजारी पाजारी विचारपूस सुरू केली. तेव्हा बाजूला राहणाऱ्या शुभम काळेने काठीने पिल्लाचा जीव घेतल्याचे त्यांना समजले. तेथून सरळ अंजली गणवास यांनी मुकुंदवाडी ठाणे गाठले आणि आपल्या कुत्र्याला शेजारी राहणाऱ्या शुभम काळेने मारले आहे, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा, अशी मागणी केली.

काय गुन्हा नोंदवावा? पोलिसांसमोर प्रश्नमाणसाला मारणाऱ्याविरुद्ध काय गुन्हा नोंदवायचा, यासाठी पोलिसांना कायद्याच्या पुस्तकाची गरज पडत नाही. कारण दररोज अशा तक्रारी येताच असतात.मात्र, अंजली गणवास हा जेव्हा आपल्या कुत्र्याच्या पिल्लाच्या हत्येची तक्रार घेऊन आल्या तेव्हा पोलीसही चक्रावले. काय गुन्हा नोंदवावा, याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आपआपसात चर्चा झाली. अखेर कायद्याच्या पुस्तकाचा आधार घेण्यात आला. मग पुस्तकाच्या अधारे अंजली गणवास यांच्या तक्रारीवरून शुभम काळेविरुद्ध कलम ४२८ भादंविसह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११(१) (ठ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार साहेबराव गवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.