शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena Yashwant Jadhav : चर्चेत आलेले यशवंत जाधव आहेत तरी काेण?; 'ती' ऑडिओ क्लिप आली आणि चर्चा वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 10:45 IST

Shiv Sena Yashwant Jadhav : जाधव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सलग चारवेळा त्यांना अध्यक्षपद देण्यात आले.

सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या यशवंत जाधव यांनी गेल्या दोन दशकांमध्ये महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सलग चारवेळा त्यांना अध्यक्षपद देण्यात आले. मात्र ठेकेदाराला त्यांच्या वॉर्डात काम करण्यास विरोध करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जाधव अडचणीत आले. 

माझगाव, ताडवाडी येथील सफाई कामगाराच्या कुटुंबातील यशवंत जाधव यांचा जन्म आहे. १९७८ मध्ये त्यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राजकारणाला सुरुवात केली. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा  निवडून आले. २००२ मध्ये नगरसेवक पदाची संधी हुकल्याने जाधव यांनी उपविभागप्रमुख पदाचे काम पहिले. २००७ मध्ये पक्षाने संधी दिली व ते पुन्हा निवडून आले, तर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांना सलग दोन वर्षे उद्यान व बाजार समितीचे अध्यक्षपद मिळाले.

२०१२ मध्ये त्यांच्या पत्नी यामिनी जाधव निवडून आल्या, तर त्यांचा मात्र पराभव झाला होता. यामिनी जाधव महापौर पदाच्या स्पर्धेत होत्या, मात्र त्यांना संधी नाकारली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून निवडून आल्या, तर २०१७ मध्ये यशवंत जाधव तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. त्यामुळे शिवसेना पक्षाने त्यांच्यावर सभागृह नेतेपद सोपविले. त्यानंतर २०१८ पासून सलग चार वर्षे ते स्थायी समिती अध्यक्ष आहेत. 

ऑडिओ क्लिपमुळे जाधव अडचणीत भायखळ्यामध्ये काम करणाऱ्या ठेकेदाराला प्रकल्पातून माघार घेण्यासाठी त्यांनी धमकावल्याची ऑडिओ क्लिप २०२० मध्ये व्हायरल झाली, तर जाधव यांच्यावर असमान निधी वाटपाचा आरोप भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला होता. तर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवल्याचा आरोप झाल्याने त्यांची चौकशी झाली होती. तसेच जाधव दाम्पत्यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाIncome Taxइन्कम टॅक्स