शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार थांबायलाच हवा

By admin | Updated: September 3, 2014 01:13 IST

देश कसा असायला हवा, कोणकोणते नियम असायला हवे, भ्रष्टाचार थांबविणे किती गरजेचे आहे व त्यावरील उपाय काय, यावरील मत ज्येष्ठांनी नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनी मांडले. निमित्त होते लोकमत कॅम्पस क्लब

निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मांडले मत : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : देश कसा असायला हवा, कोणकोणते नियम असायला हवे, भ्रष्टाचार थांबविणे किती गरजेचे आहे व त्यावरील उपाय काय, यावरील मत ज्येष्ठांनी नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनी मांडले. निमित्त होते लोकमत कॅम्पस क्लब (बाल विकास मंच) व स्व. दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था प्रस्तुत आंतरशालेय निबंध स्पर्धेचे. शहरातील १५० शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. ‘मी देशाचा पंतप्रधान झालो तर’, आणि ‘विशुद्ध पर्यावरण एक सामाजिक जबाबदारी’ या दोनपैकी एका विषयावर निबंध लिहायचे होते. यात जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी ‘मी पंतप्रधान झालो...’ या विषयावर आपल्या भावना मोकळ्या केल्या.त्यांच्या बुद्धीच्या मानाने त्यांनी मांडलेले मत आश्चर्य व्यक्त करणारे आहे, असे स्पर्धेचे परीक्षक रश्मी वाटाणे यांचे म्हणणे आहे. विशुद्ध पर्यावरणासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करायला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक झाड दत्तक घ्यावे, इंधनाची बचत, आपला परिसर स्वच्छ ठेवणे आदी बाबींवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना निबंधाद्वारे उतरविल्या. स्पर्धेचे पुरस्कार वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी दौलतराव ढवळे शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र ढवळे, मुख्याध्यापिका रश्मी वाटाणे, नीलेश सोनटक्के, श्री सत्यसाई कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका अनुराधा हटवार, उपमुख्याध्यापिका शोभना साहू व इव्हेंट मॅनेजर अमित रोशनखेडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)विजेत्या स्पर्धकांची नावेनिंबध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री सत्यसाई कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी संपदा नीरज देशमाने (५००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह) हिने पटकाविला. द्वितीय क्रमांक विदर्भ बुनियादी हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती चिंतामण तिडके (३००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह) हिने तर तृतीय क्रमांक हडस हायस्कूलची विद्यार्थिनी सोनल प्रकाश जोडदंड (२००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह) यांना मिळाला. उत्तेजनार्थ पुरस्कार पं. बच्छराज विद्यालयाची विद्यार्थिनी तनिष्का काकडे, तेजस्विनी विद्या मंदिरची विद्यार्थिनी सृष्टी महिंद्र राडे हिला मिळाला.