शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

स्त्रियांनी लिहिते होणे आवश्यक

By admin | Updated: March 7, 2017 01:08 IST

स्त्रियांचे अनुभव, त्यांचे सुख-दु:ख साहित्यात येणे आवश्यक आहे.

पिंपरी : स्त्रियांचे अनुभव, त्यांचे सुख-दु:ख साहित्यात येणे आवश्यक आहे. जेणेकरून ते साहित्य महिलांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे स्त्रियांनी लिहिते होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया वाड यांनी केले. स्वानंद महिला संस्था आणि आॅल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन महिला विभाग यांच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंग मंदिरात बारावे अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन सोमवारी झाले. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन आॅल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. रुचिरा सुराणा यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष मंगल संचेती, मुंबई दूरदर्शन केंद्राचे महासंचालक मुकेश शर्मा, ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे, संमेलनाच्या मुख्य संयोजिका सुरेखा कटारिया, स्वानंद संस्थेच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षा वर्षा टाटिया, पारस मोदी, डॉ. नलिनी जोशी, कांतीलाल बोथरा, मोहनलाल संचेती, प्रमिला सांकला, रंजना लोढा, आदेश खिंवसरा आदी उपस्थित होते.डॉ. वाड म्हणाल्या, ‘‘स्त्री साहित्याकडे हेटाळणीने पाहण्याचे दिवस गेले आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या मनाचे विरेचन साहित्यातून केले आहे. तसेच आपल्या साहित्याची समीक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावी. कारण जो समीक्षेकडे सकारात्मकतेने पाहतो, तोच खरा साहित्यिक होय. पालकांनी मुलींना स्वातंत्र्य द्यावे, जेणेकरुन त्या मुक्त वावरतील आणि त्यातून आपल्याला उत्तम साहित्य मिळेल.’’ जैन कॉन्फरन्स पंचम झोन प्रदेशाध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांनी प्रास्ताविक केले.मराठी साहित्याचे वाचन जैन महिला खूप करतात. मात्र त्या लिखाण करत नाहीत. त्यांची विचारक्षमता जास्त असते. मात्र त्या बोलत नाहीत. या महिलांनी लिहिले पाहिजे. आपले विचार व्यक्त केले पाहिजेत, असे आवाहन रुचिरा सुराणा यांनी केले. मंगल संचेती यांनी स्वागत केले. या वेळी जैन विद्या प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस दिवंगत शंकरलाल मुथा यांच्या जीवनचरित्रावर आधारित ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सकाळी आठला संत तुकारामनगर येथील संत तुकाराममहाराज मंदिरापासून आचार्य अत्रे रंगमंदिरापर्यंत ग्रंथदिंडीही काढण्यात आली.>परिसंवाद : करिअर जन्मठेप नव्हे, स्वावलंबनघर सांभाळून नोकरी करणे हे महिलांचे कौशल्यच आहे. आजची स्त्री या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहे. करिअर हे महिलांसाठी जन्मठेप नसून, स्वावलंबन आहे, असा सूर संमेलनातील सहाव्या सत्रात झालेल्या परिसंवादात उमटला. अध्यक्षस्थानी आॅल इंडिया जैन कॉन्फरन्सचे महामंत्री अशोककुमार पगारिया होते. या परिसंवादात प्रतिभा जगताप, हणमंत पाटील, दीपक मुनोत, सुरेखा कटारिया यांनी भाग घेतला. डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचलन केले. > महिला एकत्र येण्यासह त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आणि महिलांविषयक साहित्याची दिशा निश्चित करण्यासाठी संमेलनाचे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. स्त्रियांना स्वावलंबी बनविणे आणि स्त्री चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी स्त्रियांचे साहित्य हे प्रमुख माध्यम आहे. - मंगला अभय संचेती, स्वागताध्यक्षा, अ.भा. स्त्री साहित्य-कला संमेलन