शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...हे तर इस्लाम धर्मात महापाप!

By admin | Updated: October 20, 2015 04:30 IST

संत पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणे, हे इस्लाम धर्मात महापाप समजले जाते, त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी प्रवेशासाठी निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती सोमवारी

हाजीअली ट्रस्टची भूमिका : म्हणे, संत पुरुषाच्या कबरीजवळ महिला नकोचमुंबई : संत पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणे, हे इस्लाम धर्मात महापाप समजले जाते, त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी प्रवेशासाठी निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती सोमवारी हाजीअली ट्रस्टच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. हाजीअली दर्ग्याच्या गाभाऱ्यात महिलांना बंदी घालण्याच्या ट्रस्टच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेची सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठासमोर सुरु आहे. बंदीविरोधात डॉ. नूरजहाँ नियाज आणि भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या झाकीया सोमण यांनी त्याबाबत मार्च २०१२ मध्ये याचिका दाखल केलेली आहे.ट्रस्टने मंजूर केलेला ठराव ट्रस्टची बाजू मांडणारे अ‍ॅड. शोएब मेमन यांनी सोमवारी खंडपीठापुढे सादर केला. दर्ग्यामध्ये उपासना करणे, हे इस्लाम धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे आहे की नाही? याचे उत्तर ट्रस्टला द्यायचे होते, असे याचिकाकर्त्यांचे वकील राजू मोरे यांनी खंडपीठाला सांगितले. ‘आम्हाला आशा आहे की, यावर काहीतरी तोडगा निघेल,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला ठेवली. यावेळी खंडपीठ या याचिकेवरील अंतिम सुनावणीची तारीख निश्चित करेल. (प्रतिनिधी)महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना पुरुषांपासून स्वतंत्र ठिकाणी प्रार्थनेसाठी जागा निश्चित करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.आमच्या कारभारात ढवळाढवळ नाहीट्रस्टची स्थापना राज्यघटनेच्या अधीन राहून करण्यात आली आहे. ट्रस्टला स्वत:चा कारभार कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय चालवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ट्रस्टच्या कारभारात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही, असे ठरावात म्हटले आहे. महिलांचे हित लक्षात घेऊनच हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यांना कबरीच्या जवळच नमाज पठण्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात आल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. ‘महिलांना कबरीजवळ कधीच न जाऊ देण्यावर सर्व विश्वस्तांचे एकमत आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेले प्रवेशद्वार कबरीपासून जवळच आहे,’ असेही अ‍ॅड. मेमन यांनी खंडपीठाला सांगितले.