शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जोगवा मागून ‘तो’ करतोय इंजिनिअरिंग

By admin | Updated: March 27, 2017 02:44 IST

सिया पाटील हा तृतीयपंथी जोगवा मागून आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे

शिरूर : सिया पाटील हा तृतीयपंथी जोगवा मागून आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. कुटुंबाने अद्याप त्याच्या या रूपास स्वीकारले नसल्याने तीन वर्षांपूर्वी त्याने घर सोडले. जोगवा मागून मिळणाऱ्या पैशातून, तसेच साथीदारांच्या मदतीतून त्याने इंजिनिअरिंगची दोन वर्षे पूर्ण केली असून, आता तो तृतीय वर्षास आहे. समाजाने आम्हाला आहे तसे स्वीकारले पाहिजे, अशी अपेक्षा त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. सिया पाटील हे आताचे नाव, मूळ नाव दुसरे. पुरुष म्हणून जन्माला आला म्हणून घरातील मंडळींनी आनंद व्यक्त केला. पाटोदा येथे त्यास शाळेत दाखल करण्यात आले. आठवीत त्याच्या शरीरातील बदलाविषयी त्याला समजले. आपण काहीतरी वेगळे आहोत, याची जाणीव झाली. कुटुंबातील लोकांना सांगितले. मात्र, यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. कसेबसे त्याने तसेच शिक्षण सुरू ठेवले. दहावीला ६८ टक्के गुण मिळवले. पाटोद्यातच अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीतही ७० टक्के गुण मिळवले. शिक्षण सुरू होते; मात्र मानसिक संघर्ष सुरूच होता. कुटुंबच स्वीकारत नाही. मग समाज कसा स्वीकारणार, हा प्रश्न त्याला अस्वस्थ करीत होता. त्याच मन:स्थितीत घर सोडण्याचा निर्णय घेतला. संदीप गिरी या जोगत्याशी सियाचा संपर्क आला. त्यास सारे ‘मम्मी’ म्हणून संबोधतात. मम्मीने सहारा दिला. सियाला इंजिनिअरिंग करायचे होते. मम्मीशी सल्लामसलत करून सियाने कुरुंद येथे इंजिनिअरिंग महाविद्यालयात २०१४मध्ये प्रवेश घेतला. तत्पूर्वी सियाने सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. पँट-शर्टमध्ये वावरणारा मुलगा साडी नेसू लागला. लांब केस, कपाळाला कुंकू. घरात लाडात जीवन जगणाऱ्या सियाने जोगवा मागण्यास सुरुवात केली. सहकाऱ्यांसमवेत जोगवा मागण्याबरोबरच देवाचे कार्यक्रमही करू लागला. यातून मिळणाऱ्या पैशातून कॉलेजचे शुल्क भरले, अभ्यासाची पुस्तके घेतली. अर्थात, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला मोलाची मदत केली. यातूनच त्याने इंजिनिअरिंगची दोन वर्षे पूर्ण केली. याच महिन्यात त्याची तिसऱ्या वर्षाची परीक्षा आहे. (वार्ताहर)कॉलेजात पुरुष, घरी तृतीयपंथी सिया तीन वर्षे झाली महाविद्यालयात जात आहे. महाविद्यालयात जाताना पँट-शर्ट घालून पुरुष बनून जावे लागते. घरी आल्यावर साडी नेसून जोगवा मागण्याची तयारी करावी लागते. कॉलेजात पुरुष, घरी तृतीयपंथी अशीच भूमिका त्याला दररोज बजवावी लागते.