ऑनलाइन लोकमतमुंबई : तरुणाईमध्ये लोकप्रिय असणाऱ्या लेखक चेतन भगतने मंगळवारी टिष्ट्वटरवरुन चाहत्यांशी व्हिडिओद्वारे संवाद साधला. #AskChatan या हॅशटॅगच्या माध्यमातून टिष्ट्वटरवर नेटिझन्सने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. या प्रश्नांना चेतन भगत यांनी टिष्ट्वट्स आणि व्हिडिओज्च्या माध्यमातून उत्तरे दिली.
सोशल मीडीयाच्या विस्ताराचा विनियोग करण्याच्या दृष्टिकोनातून चेतन भगत यांनी टिष्ट्वटरच्या व्यासपीठाचा उपयोग केला. यावेळी उत्साही नेटिझन्सने चेतन भगत यांच्या भविष्यातील प्लान्स आणि वैयक्तिक आयुष्याविषयी रंजक प्रश्न विचारले. या प्रश्नांना चेतन भगत यांनीही हजरजबाबीपणा दाखवित उत्तरे दिली.
यावेळी, चेतन भगत यांना राजकारणात सहभागी का होत नाही? असे विचारले असता राजकारणात सहभाग घेण्यापेक्षा त्याविषयी लिहिणे सोयीचे असल्याचे त्यांनी मिश्किलपणे सांगितले. तर भगत यांनी यापूर्वी फाईव्ह पाइंट समवन, हाफ गर्लफ्रेंड्स, थ्री मिस्टेक्स आॅफ माय लाईफ आणि वन नाईट इन कॉलसेंटर अशी पुस्तके लिहिली आहेत. त्यावरुन भगत यांना तरुणाईने आगामी पुस्तकात क्रमांकाचा समावेश असणार का? असे विचारले असता, यावर भगत यांनी या वेळीही पुस्तकात क्रमांकाचा समावेश असून येत्या दोन आठवड्यांत याचे उत्तर देण्याची ग्वाही दिली.
बऱ्याचदा चेतन भगत यांना सोशल मीडीयावर टार्गेट केले जाते. त्या पार्श्वभूमीवर भगत यांना विचारले असता ते म्हणाले की, कौतुक असो वा निंदा कधीच गंभीरपणे घेत नाही. अशा या प्रश्न-उत्तरांच्या ेसेशनमध्ये चेतन भगत यांचा जीवनप्रवास उलगडला......................मुलीच्या भूमिकेतून लिहिणार आहेआॅक्टोबर महिन्यात प्रकाशित होणाऱ्या नव्या पुस्तकातून वेगळाच विषय अनुभवायला मिळणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ह्यमुलीच्या भूमिकेतून लिहिणारह्ण असल्याचे चेतन भगत यांनी सांगितले.