शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्‍या समस्‍या शासन दरबारी, गुलाबी बोंडअळीच्‍या समस्‍येवर उपाय शोधण्‍यासाठी परिसंवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:33 IST

कपाशीवर आलेल्‍या गुलाबी बोंडअळीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांच्‍या शेताचे सर्वेक्षण करण्‍याचे आदेशही शासनाने काढले आहे.

यवतमाळ :   कपाशीवर आलेल्‍या गुलाबी बोंडअळीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांच्‍या शेताचे सर्वेक्षण करण्‍याचे आदेशही शासनाने काढले आहे. शेतक-यांच्‍या ज्या काही समस्या असतील त्या शासन दरबारी मांडून सोडविण्‍याचा प्रयत्‍न करू, असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन मिशनचे अध्‍यक्ष किशोर तिवारी यांनी केले. बळीराजा चेतना अभियान व कृषी विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन’ या विषयावर जिल्‍हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील श्रोतृगृहात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रकाश पोहरे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कापूस संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ. विश्‍लेश नगराळे, डॉ. नेमाडे, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख, अॅड. पाटील उपस्थित होते. खरीप हंगामात कापूस पिकावर आलेली गुलाबी बोंडअळी तसेच भविष्‍यात कापूस पिकावर बोंडअळींचा प्रादुर्भाव होऊ नये, याबाबत परिसंवादात चर्चा करण्यात आली. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटावर आता मात केली नाही तर पुढच्‍यावर्षी कापूस पीक घेणे कठिण जाणार असल्‍याचे मत मान्यवरांनी व्‍यक्‍त केले. त्‍यामुळे आतापासूनच सर्वच स्‍थरावर दक्ष राहून उपाययोजना करण्‍याबाबत  शेतक-यांना आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे यांनी तर उपस्थितांचे आभार बळीराजा चेतना अभियानाच्‍या वतीने मानन्‍यात आले. या परिसंवादाला जिल्‍हयातील उपविभागीय कृषी अधिकारी, प्रगतीशील शेतकरी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक उपस्थित होते.