शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या मुद्यावर शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर!

By admin | Updated: March 14, 2016 01:25 IST

शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक; बुधवारी करणार आंदोलन.

अकोला: तीन वर्षांपासून सातत्याने नापिकीचा सामना करीत असलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी सरकारने केवळ ५५ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली. त्यामुळे शेतकर्‍यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या मुद्यावर आता राज्यात सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकारला घरचा आहेर देत आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोला जिल्हा शिवसेनेने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची आढावा बैठक रविवार दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत शासनाकडून विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गत आठवड्यात शिवसेना पदाधिकार्‍यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली होती, असे सांगून जिल्हा प्रमुखांनी या मुद्यावर कोणताही समाधानकारक निर्णय अद्याप शासनाकडून घेण्यात आला नसल्याने शिवसेनेला शेतकर्‍यांच्या मुद्यावर आक्रमक व्हावे लागेल, असा इशारा दिला. शिवसेनेतर्फे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत धरणे दिले जाणार असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले. या आंदोलनात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह सर्व कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी अडचणीत असतील तेव्हा त्यांच्या मदतीला शिवसैनिक धावून जाईल. त्यासाठी आम्ही सत्तेत आहो किंवा नाही याचा विचार करणार नाही. आंदोलन करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच शिवसैनिकांचा जन्म झाला असल्याचे पिंजरकर म्हणाले. तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार रामाभाऊ कराळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपजिल्हा प्रमुख सेवकार ताथोड, बंडू ढोरे, उपमहापौर विनोद मापारी यांनी आढावा बैठकीत विचार व्यक्त केले. प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख राजेश मिश्रा यांनी तर संचालन योगेश गीते यांनी केले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, ज्ञानदेवराव परनाटे, तरुण बगेरे, बादलसिंग सुकेडे, हरिभाऊ भालतिलक, धनंजय गावंडे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, संजय शेळके, संतोष अनासने, अतुल पवनीकर, योगेश अग्रवाल, गजानन चौधरी, शंकरराव ताथोड, गजानन चव्हाण आदींसह बहुसंख्य आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.