शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 05:32 IST

न्यायालयाने पोलिस महासंचालकांना प्रतिज्ञापत्राद्वारे याचे स्पष्टीकरण मागितले.

मुंबई - पोलिस दलात शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करत,  उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांनी जारी केलेले परिपत्रके  सर्व पोलिस कर्मचाऱ्यांवर बंधनकारक आहेत की केवळ प्रतीकात्मक आहेत, असा थेट सवाल उपस्थित केला.

न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने ७ जुलै रोजी दिलेल्या आदेशात नमूद केले की, पोलिस कर्मचारी कायद्याचे आणि डीजीपी कार्यालयाकडून वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत, हे अत्यंत निषेधार्ह आहे. डीजीपी कार्यालयाकडून केस डायरी कशी ठेवायची यासंदर्भात वेळोवेळी परिपत्रके काढण्यात आली आहेत, तरीही पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने, न्यायालयाने पोलिस महासंचालकांना प्रतिज्ञापत्राद्वारे याचे स्पष्टीकरण मागितले.

पुढील सुनावणी २१ जुलैलागुन्हा जून २०२४ मध्ये दाखल झाला, मात्र चौकशीचा अत्यंत मूलभूत भाग म्हणजे पंचनामा... तोसुद्धा आजपर्यंत करण्यात आलेला नाही. आर्थिक गुन्हा असूनही, स्थानिक पोलिस ठाण्यातील फक्त सहायक निरीक्षक दर्जाचा अधिकारी ही चौकशी करत आहे, हे गंभीर आहे, असेही न्यायालाने म्हटले. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आयुक्तांनीही प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा निर्देश देत न्यायालयाने पुढील सुनावणी २१ जुलै रोजी ठेवली आहे.

काय म्हणाले न्यायालय? पोलिस दल जरी शिस्तीचे प्रतीक असले, तरी त्यातीलच काही कर्मचारी ही शिस्त पाळत नाहीत आणि डीजीपींकडून आलेल्या बंधनकारक सूचनांचे पालन करत नाहीत, असे न्यायालयाने संतपात म्हटले. याबाबत तपशिलात प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश  पोलिस महासंचालकांना न्यायालयाने दिले. एका आर्थिक गुन्ह्याचा तपास निष्काळजीपणे करण्यात आल्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी होती. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेली केस डायरी तपासली. ती एका पिवळ्या प्लास्टिकच्या फोल्डरमध्ये सुटी पाने ठेवली होती. तसेच निष्काळजीपणाने लिहिलेली होती, असे न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbai policeमुंबई पोलीस