शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामी नववर्ष हिजरी सन १४३९ ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 14:49 IST

इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. हिजरी सन १४३८चा अखेरचा उर्दू महिना ‘जिलहिज्जा’ची २९ तारीख असल्याने संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्दे‘इमामशाही’मध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे घडते दर्शनइमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘यादे शहिदे करबला’ इस्लामी कालगणनेचा पहिला महिना म्हणून ‘मुहर्रमुल हराम’ ओळखला जातोइस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता

नाशिक : इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. हिजरी सन १४३८चा अखेरचा उर्दू महिना ‘जिलहिज्जा’ची २९ तारीख असल्याने संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ढगाळ हवामान नसल्यास चंद्रदर्शन घडू शकते. चंद्रदर्शनाची ग्वाही प्राप्त झाल्यास सायंकाळपासून मुस्लीम बांधवांचा हिजरी सन १४३९ या नववर्षाला प्रारंभ होईल. चंद्रदर्शनाची नाशिक विभागातून ग्वाही चांद समितीला प्राप्त न झाल्यास चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण केले जातील. इस्लामी कालगणनेचा पहिला महिना म्हणून ‘मुहर्रमुल हराम’ ओळखला जातो. हा महिना धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या प्रिय कन्या हजरत फातिमा यांचे पुत्र शहीद हजरत इमाम-ए-हूसेन यांच्या स्मृतींना उजाळा देतो. मुहर्रमचे पहिले दहा दिवस मुस्लीम बांधवांकडून ठिकठिकाणी इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘यादे शहिदे करबला’ या प्रवचनमालांचे आयोजन केले जाते. नाशिकमध्येही जुने नाशिक, वडाळागाव, वडाळारोड, सातपूर, देवळाली कॅम्प आदि परिसरांमध्ये दहा दिवसीय प्रवचनमालांचे विविध धार्मिक सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. मुहर्रमच्या दहा तारखेला मुस्लीम बांधवांकडून ‘आशुरा’चा दिवस पाळला जातो. या दिवशी इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विशेष नमाजपठण फातिहापठण व सरबतचे सामुहिकरित्या वाटप केले जाते. काही शहरांमध्ये ताबूतांची मिरवणूक काढण्याचीही पारंपरिक प्रथा आहे; मात्र या पारंपरिक प्रथेला धार्मिक शास्त्रानुसार कुठलाही आधार नसल्याचे धर्मगुरूंकडून दहा दिवसीय प्रवचनमालांमध्ये सांगितले जाते. ताबूताच्या पारंपरिक प्रथेविरुध्द समाजाचे प्रबोधन धर्मशास्त्राच्या आधारे करण्याचा मुस्लीम धर्मगुरूंकडून केला जातो.

‘इमामशाही’मध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे घडते दर्शनजुन्या नाशिकमधील सारडा सर्कल येथील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांचा दर्गा ‘इमामशाही’ नावाने ओळखला जातो. या दर्ग्यात दरवर्षी मुहर्रम महिन्याच्या आठ ते दहा तारखेपर्यंत उत्सव साजरा केला जातो. अळीवच्या बियांपासून येथील सय्यद कुटुंबिय पारंपरिक प्रथेनुसार हिरवळीचा ताबूत तयार करतात. दहा दिवस या ताबूतासाठी मेहनत घेऊन त्यावर हिरवळ फुलविण्याचा प्रयत्न केला जातो. हा ताबूत मानाचा असल्याची अख्यायिका आहे. मुहर्रमच्या दहाव्या दिवशी दर्गाच्या परिसरात या ताबूताचे खांदेकरी म्हणून हिंदू कोळी बांधवांना मान दिला जातो. हा मान मागील शेकडो वर्षांपासूनचा आहे. शेकडो वर्षे जुन्या या पारंपरिक प्रथेमधून आजही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन दरवर्षी घडते.